शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साठीतही जपलाय ऑलिम्पिक संग्रहाचा खजिना; रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे आठवणींचा ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 08:45 IST

 कनोजिया हे नागपुरातील संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. थोर, महान व्यक्तींबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडे भरपूर संग्रह आहे. 

मंगेश व्यवहारेनागपूर : सध्या टोकियो ऑलिम्पिककडे जगाच्या नजरा आहेत. नागपुरातील महाल भागात राहणाऱ्या रूपकिशोर कनोजिया यांच्याकडे असलेला ऑलिम्पिकशी संबंधित संग्रह लक्ष वेधून घेतोय. विविध नाणी, डाक तिकिटे, फर्स्ट डे कव्हर आदी खजिना त्यांच्या छोट्याशा कौलारू घराला मौल्यवान बनवतो. याशिवाय त्यांच्याकडील ऑलिम्पिकशी संदर्भातील घटना, आठवणींचा ठेवा त्यांच्या या संग्रहीवृत्तीला आणखी समृद्ध बनवतो. कनोजिया हे नागपुरातील संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. थोर, महान व्यक्तींबरोबरच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याकडे भरपूर संग्रह आहे. 

रोचक आठवणी मुखोद्गत ऑलिम्पिकची सुरुवात कधी झाली, सर्वाधिक ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशाने केले, काही वर्षी ऑलिम्पिक का झाले नाही, हिटलरने मेजर ध्यानचंदबद्दल व्यक्त काढलेले कौतुकोद्गार, भारताचे पहिले पदक, भारतीय महिला खेळाडूने मिळविलेले पहिले पदक, आतापर्यंत भारताची पदतालिका अशा अनेक गोष्टी, किस्से, रोचक आठवणी त्यांना मुखोद्गत आहेत. 

विविध वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असल्याने, ऑलिम्पिकशी निगडित साहित्यसुद्धा मिळाले. खेळात रुची असल्याने ऑलिम्पिकची दुर्मिळ माहिती गोळा करीत गेलो. त्यातून हा संग्रह जमला.  हा दुर्लभ खजिना आपल्याजवळ असल्याचा आनंद आहे. - रूपकिशोर कनोजिया, संग्राहक

रूपकिशोर हे सुरूवातीला मिलमध्ये कामगार होते. मिल बंद पडल्यानंतर त्यांनी सूतिकागृहात काम केले. पण संग्रहाचा छंद सोडला नाही. आज ते ६० वर्षांचे आहेत. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021