शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

भारतीय महिलांपुढे खडतर आव्हान

By admin | Updated: March 22, 2016 02:54 IST

पाकिस्तानविरुद्ध डकवर्थ लुईस नियमामुळे निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय

धरमशाला : पाकिस्तानविरुद्ध डकवर्थ लुईस नियमामुळे निसटता पराभव पत्करावा लागल्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला इंग्लंड महिलांचे आव्हान पेलण्यास सज्ज झाल्या आहेत. धरमशाला येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. पाकविरुद्ध पावसामुळे झालेला पराभव विसरून भारताला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी कर्णधार मिताली राज, झूलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौर यांच्यावर असेल. त्याचवेळी सलामीच्या सामन्यात चार्लोट एडवडर््सच्या नेतृत्वामध्ये खेळणाऱ्या इंग्लंडने बांगलादेशला सहज लोळवले असले तरी, दुसऱ्या सामन्यात भारताचे कडवे आव्हान असल्याची जाणीव असल्याने इंग्लंड सर्वोत्तम कामगिरीच्या प्रयत्नात असतील. एडवडर््सचा खेळ बांगलादेशविरुद्धच्या विजयामध्ये निर्णायक ठरला होता. तिने शानदार अर्धशतक झळकावताना आपली चमक दाखवली होती. तसेच टैली बीमोंट, नतेली स्कीवर यांच्यावरही फलंदाजीची मदार असेल. त्याचप्रमाणे कॅथरीन ब्रंटचा अष्टपैलू खेळ इंग्लंडसाठी निर्णायक असेल.दुसरीकडे यजमान भारतासाठी कर्णधार मिताली फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. वेदा कृष्णमूर्ती, वेलास्वामी वनिता, हरमनप्रीत कौर यांच्यावरही भारताचा विजय अवलंबून आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवी झूलनच्या नेतृत्वाखाली शिखा पांडे, पूनम यादव आणि अनुजा पाटील अचूक मारा करण्यास सज्ज आहेत. (वृत्तसंस्था)> भारत : मिताली राज (कर्णधार), एकता बिष्ट, राजेश्वरी गायकवाड, थिरुष कामिनी, हरमनप्रीत कौर, वेदा कृष्णमूर्ती, स्मृती मानधना, निरंजन नागार्जन, शिखा पांडे, अनुजा पाटील, दीप्ती शर्मा, वेलास्वामी वनिता, सुषमा वर्मा व पूनम यादव.इंग्लंड : चार्लोट एडवडर््स (कर्णधार), टैमी बीमोंट, जॉर्जिया एल्विस, नताशा फरांट, लिडिया ग्रीनवे, रेबेका ग्रंडी, जेनी गुल, डॅनियल हेजल, एमी जोंस, हीथर नाइट, नटाली स्किवर, अन्या श्रबसोल व डॅनियल वॅट्ट.