शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Tokyo Paralympics: IAS अधिकारी सुहास यथीराज इतिहास रचणार; टोक्योत रविवारी सुवर्णपदक जिंकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:59 IST

Tokyo Paralympics: टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंनी गाजवला. प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताच्या प्रमोद भगतने सुवर्णपदक, मनोज सरकारनं कांस्यपदक जिंकले.

Tokyo Paralympics: टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत शनिवारचा दिवस भारतीय बॅडमिंटनपटूंनी गाजवला. प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धेत समाविष्ठ करण्यात आलेल्या बॅडमिंटन क्रीडा प्रकारात भारताच्या प्रमोद भगतने सुवर्णपदक, मनोज सरकारनं कांस्यपदक जिंकले. भारतानं यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेत चार सुवर्ण, ७ रौप्य व ६ कांस्य अशी एकूण १७ पदकांची कमाई केली. भारताला आणखी एक सुवर्णपदक खुणावत आहे आणि हे पदकही ऐतिहासिक ठरणार आहे. सुहास लालिनाकेरे यथीराज ( Suhas Lalinakere Yathiraj ) यांनी बॅडमिंटनच्या SL 4 गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी ३८ वर्षीय सुहास सुवर्णपदकासाठी कोर्टवर उतरणार आहेत. या सामन्याचा निकाल काही लागला, तरी सुहास इतिहास रचणार आहेत. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे ते पहिले IAS अधिकारी ठरणार आहेत. 

Neearaj Chopra : नीरज चोप्राला विचारला गेला 'Sex Life' बद्दल प्रश्न; आणि मग सोशल मीडियावर...

सुहास हे नॉएडा येथील गौतम बुद्धनगर येथे जिल्हाधिकारी आहेत. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत त्यांनी इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटीवनचा २१-९, २१-१५ असा अवघ्या ३१ मिनिटांत पराभव केला. २००७च्या बॅचमधील IAS अधिकारी असलेल्या सुहास यांना अंतिम फेरीत फ्रान्सच्या अव्वल मानांकित लुकास माझूर  याचा सामना करावा लागणार आहे. ''इतिहास घडण्याच्या तयारीत आहे. सुहास हे उत्तर प्रदेशातील नॉएडा येथी गौतम बुद्धनगर येथे जिल्हाधिकारी आहेत,''असे IAS असोसिएशनने ट्विट केले.  कर्नाटकात जन्मलेल्या सुहास यांनी इंजिनियरींगमध्ये पदवी घेतली. कर्नाटकच्या NITमधून त्यांनी  computer engineer मध्ये पदवी घेतली. यापूर्वी त्यांनी प्रयागराज, आग्रा, आझमगड, जौनपूर, सोनभद्रा जिल्हा येथे सेवा दिली आहे. मागील दीड वर्षांपासून ते गौतम बुद्ध नगर येथे कार्यरत असून कोरोना व्यवस्थापनाचे काम ते पाहत आहेत.  २०१६पासून त्यांनी बॅडमिंटन खेळण्यास सुरूवात केली.   

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाBadmintonBadminton