शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Tokyo Paralympics: चीनला नमविले! नेमबाज अवनी लेखराचा सुवर्णवेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:30 IST

Avani Lekhara wins Gold Medal : अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) भारतीय नेमबाज अवनी लेखरा (Avani Lekhra) ने सुवर्णपदकाचा वेध घेतला. 10 मीटर एअर रायफलच्या क्सास एसएच १ मध्ये तिने हे पदक पटकावले आहे. महत्वाचे म्हणजे पॅरालिम्पकच्या इतिहासात भारतला शूटिंगमध्ये मिळालेले हे पहिले सुवर्ण पदक आहे. तिने 249.6 चा स्कोअर बनविला आहे. अवनी ही जयपूरची आहे. (Tokyo Paralympics: India's Avani Lekhara wins Gold Medal in women's 10m AR Standing SH1 Final )

 

अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 21 नेमबाजांनी भाग घेतला होता. यामध्ये सातव्या स्थानावर असलेल्या अवनीने चांगले प्रदर्शन करत फायनलमध्ये प्रवेश केला. तिने 60 सीरीजच्या सहा शॉटमध्ये 621.7 स्कोअर बनविला. यामुळे तिला पहिल्या आठमध्ये जागा मिळाली. चीनची झांग कुइपिंग आणि यूक्रेनॉची इरियाना शेतनिक 626.0 स्कोअर केला होता. 

भारताला मिळालेली पदके....रविवारी भाविनाबेन पटेलने महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत क्लास 4 मध्ये आणि निषाद कुमारने पुरुषांच्या टी 47 उंच उडी स्पर्धेत रौप्य दक पटकावले. तसेच थाळीफेकमध्ये विनोद कुमारने रविवारी कांस्य पदक पटकावले होते. मात्र, त्याच्या अपंगत्वाच्या प्रकारावर आक्षेप घेतल्याने त्याला याचा आनंद साजरा करता आला नव्हता. यामुळे पदक समारंभ 30 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. 

टॅग्स :ShootingगोळीबारParalympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धा