शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Tokyo Olympics: मीराबाई चानूला मिळू शकतं 'सुवर्ण'पदक; चीनच्या गोल्ड मेडलिस्ट वेटलिफ्टरची डोपिंग चाचणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 14:22 IST

Tokyo Olympics: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू ( Mirabai Chanu) हीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करताना इतिहास घडवला.

Tokyo Olympics: भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानू ( Mirabai Chanu) हीनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करताना इतिहास घडवला. महिलांच्या ४९ किलो वजनी गटाच्या भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या खेळाडूंना तोडीस तोड लढत देत वेटलिफ्टर मीराबाई चानूनं रौप्यपदकाची कमाई केली. २००० मध्ये झालेल्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कर्नाम मल्लेश्वरीने भारोत्तोलनमध्ये भारतासाठी कांस्यपदक पटकावले होते. त्यानंतर या क्रीडाप्रकारात ऑलिम्पिक पदक पटकावणारी मीराबाई चानू ही भारताची दुसरी भारोत्तोलक ठरली. पण, तिचे हे रौप्यपदक सुवर्णपदकात बदलू शकते.

भारोत्तोलनाच्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात शनिवारी मीराबाई चानू हिने स्नॅचमध्ये ८७ आणि क्लिन व जर्कमध्ये ११५ किलो असे मिळून २०२ किले वजन उचलले आणि रौप्य पदावर नाव कोरले. या गटाच चीनच्या हाओ झी हिने स्नॅचमध्ये ९४ आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे २१० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तर इंडोनेशियाच्या एशाह हिने कांस्यपदक पटकावले. सुवर्णपदक विजेत्या हाओ झी हिची अँटी डोपिंग अधिकाऱ्याकडून चाचणी करण्यात येणार आहे आणि त्यात ती दोषी आढळल्यास तिच्याकडून सुवर्णपदक काढून घेतले जाईल. ''हाओ झी हिला टोकियोत राहण्यास सांगितले आहे आणि तिची टेस्ट केली जाणार आहे. टेस्ट केली जाणारच,''असे सूत्रांनी ANIला सांगितले. नियमानुसार जर खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला तर त्याला अपात्र ठरवून पदक काढून घेतले जाते. त्यानंतर ते पदक पुढील खेळाडूला दिले जाते. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Weightliftingवेटलिफ्टिंगMirabai Chanuमीराबाई चानू