शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूनं घेतली सचिन तेंडुलकरची भेट, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 12:32 IST

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणाऱ्या मीराबाई चानू हिनं नुकतीच महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची भेट घेतली.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणाऱ्या मीराबाई चानू हिनं नुकतीच महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. वेटलिफ्टर मीराबाईनं सोशल मीडियावर सचिनसोबतचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. यावेळी सचिननं तिच्या मेडलची पाहणी करताना तिला शुभेच्छा दिल्या. २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu)  ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारतानं या ऑलिम्पिकमध्ये १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली.

PR Shrijesh : ४१ वर्षांनी भारताला पदक जिंकून दिलं अन् सत्कारात मिळाले धोतर, शर्ट व १००० रुपये...

मीराबाईनं ट्विट केलं की,''सचिन तेंडुलकर सरांची भेट घेऊन आनंद झाला. त्यांचे प्रेरणादायी शब्द हे सदैव माझ्यासोबत राहतील. ( Loved meeting sachin Sir this morning! His words of wisdom & motivation shall always stay with me. Really inspired.) 

मीराबाईनं पदक जिंकल्यानंतर सचिननेही तिचे कौतुक केले होते. त्यानं लिहिलं होतं की, मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. दुखापतीनंतर ज्या पद्धतीनं तिनं मेहनत घेत स्वतःला सावरले आणि ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले, हे उल्लेखनीय आहे. भारताला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे.''  

मीराबाईनं स्नॅच प्रकारात पहिल्या दोन प्रयत्नांत ८४ व ८७ किलो वजन उचलले, परंतु तिसऱ्या प्रयत्नांत ८९ किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली अन् तिला दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. चीनच्या होऊ झिहूनं ९४ किलो वजन उचलून ऑलिम्पिक रिकॉर्ड नोंदवला. मीराबाईनं २०१७च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ८७ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले होते. 

Anand Mahindra : मीराबाई चानूमुळे उद्योगपती आनंद महिंद्रा गहिवरले; म्हणाले, माझ्यासाठी ती आता गोल्ड मेडलिस्ट!

२०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर मीराबाई खचली होती, परंतु तिनं २०१७मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकले अन् त्यापाठोपाठ २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही बाजी मारली. कंबरेच्या दुखापतीमुळे तिला अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली. २०१९च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं प्रथमच २०० किलो वजन उचलले. तरीही तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.  २०२१च्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्देत तिनं क्लिन अँड जर्कमध्ये ११९ किलो वजन उचलून नवा वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवला. 

 

टॅग्स :Mirabai Chanuमीराबाई चानूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Sachin Tendulkarसचिन तेंडुलकर