शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympics: बजरंगाची कमाल, कांस्य धमाल; कजाकिस्तानच्या नियाजबेकोवला केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2021 05:17 IST

Tokyo Olympics: भारताला रवी आणि बजरंग यांच्या पदकांनी दिलासा मिळाला आहे. कारण कुस्तीपटूंकडून जास्त पदकांची अपेक्षा होती.

चीबा, जापान : भारतीय पहेलवान बजरंग पुनियाने शनिवारी येथे कजाकिस्तानच्या दौलत नियाजबेकोव याला ८-० ने पराभूत करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत ६५ किलो गटात कांस्य पदक मिळवले. भारताने या पदकासोबतच आपल्या ऑलिम्पिक सर्वश्रेष्ठ कामगिरीची बरोबरी केली आहे. भारताचे या स्पर्धेतील हे सहावे आणि कुस्तीतील दुसरे पदक आहे. यात रवी दहिया याने ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले होते. भारताने या आधी लंडन ऑलिम्पिकमध्ये एक रौप्य आणि कांस्य मिळ‌ले होते.भारताला रवी आणि बजरंग यांच्या पदकांनी दिलासा मिळाला आहे. कारण कुस्तीपटूंकडून जास्त पदकांची अपेक्षा होती. पदकाची प्रबळ दावेदार विनेश फोगाट ही क्वार्टर फायनलच्या पुढे जाऊ शकली नाही.उपांत्य फेरीत हाजी अलीव विरोधात बजरंग पुनियाला पराभव पत्करावा लागला. मात्र शनिवारी त्याने बचाव आणि आक्रमण यांचा योग्य समतोल साधला आणि विजय मिळवला. नियाजबेकोव यानेच २०१९ विश्व चॅम्पियनशीपमध्ये बजरंगला पराभूत केले होते. शनिवारी बजरंगचा नूर काही वेगळाच होता. त्याला पहिला गुण नियाजबेकोवच्या निष्क्रीयतेमुळे मिळाला. भारतीय पहेलवानाने डाव्या पायावर आक्रमण केले. पहिल्या पिरीयडमध्ये त्याने २ -० अशी आघाडी घेतली. त्याने वारंवार आक्रमण कायम ठेवले. त्यामुळे त्याला लवकरच ६-० अशी आघाडी मिळाली. नियाजबेकोव हा रेपशॉज राऊंड जिंकून कांस्य पदकाच्या लढाईत पोहचला होता.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021