शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic, PV Sindhu : भारताची 'बॅडमिंटनक्वीन' पी.व्ही सिंधूनं जिंकलं कांस्य पदक, चीनी खेळाडूला नमवलं; रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2021 18:02 IST

PV Sindhu Vs He Bingjiao Live Score, Tokyo 2020:

PV Sindhu Vs He Bingjiao Live Score, Tokyo 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूनं कांस्य पदकाची कमाई केली आहे. सिंधूनं चीनच्या बिंग जिओ विरुद्धच्या सामन्यात २१-१३, २१-१५ असा खणखणीत विजय प्राप्त करत पदकावर नाव कोरलं आहे. महत्वाची बाब म्हणजे सलग दोनवेळा भारतासाठी ऑलिम्पिक पदकाची कमाई करणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी सिंधूनं रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती.

पी.व्ही.सिंधूनं सामन्यात सुरुवातीपासूनच मजबूत पकड निर्माण केली होती. पहिल्या सेटची सुरुवात दमदार करत सिंधूनं ४-० असा दबाव चीनच्या बिंग जिओवर निर्माण केला होता. पण त्यानंतर चीनच्या बॅडमिंटनपटूनंही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि कमबॅक करत ५-५ अशी बरोबरी साधली होती. सिंधूनं त्यानंतर आपल्या भात्यातील सुरेख फटक्यांचा नजराणा पेश करत चीनच्या बिंग जिओवर पकड निर्माण केली. पी.व्ही.सिंधूनं पहिला सेट २१-१३ असा दिमाखात जिंकला. 

दुसऱ्या सेटमध्येही सिंधूनं आपला दबदबा कायम राखत दमदार सुरूवात केली. दुसरा सेट १०-७ असा आघाडीवर सिंधू होती. त्यानंतर चीनी खेळाडूनं चिवट खेळाचं दर्शन घडवत जबरदस्त कमबॅकही केलं. दुसरा सेट ११-११ असा रोमांचक स्थितीत पोहोचला. त्यानंतर सिंधूनं वाऱ्याच्या वेगानं शटल फटक्यांचं दर्शन घडवत चीनी खेळाडूला अवाक् करुन सोडलं. चीनी खेळाडूच्या फूटवर्कवर बारकाईनं लक्ष देत सिंधूनं तिची कमकुवत बाजू हेरली आणि पुढील चार पॉइंट आपल्या खात्यात जमाले. सिंधूनं १५-११ अशी आघाडी घेतली.  पुढे सिंधूनं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत दुसरा सेट २१-१५ नं जिंकून कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. 

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021