शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Tokyo Olympic, PV Sindhu : पी व्ही सिंधूचा रोमहर्षक विजय, जपानी खेळाडूला नमवून उपांत्य फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 14:54 IST

Tokyo Olympic 2020 : भारताची पी व्ही सिंधू आणि जपानची यामागूची अकाने यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला.

Tokyo Olympic 2020 : भारताची पी व्ही सिंधू आणि जपानची यामागूची अकाने यांच्यातला सामना कमालीचा चुरशीचा झाला. क्रॉस स्मॅश, नेट जवळील खेळ अन् प्रदीर्घ रॅली यामुळे चाहत्यांची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढत गेली होती. दोन्ही खेळाडू प्रचंड थकलेल्या असूनही एकमेकांना कडवी टक्कर देत होते. त्यांचा अप्रतिम खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा होता. दुसऱ्या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जबरदस्त कमबॅक केले. सिंधूनं दोन गेम पॉईंट वाचवताना यामागूचीचा प्रत्येक वार पलटवून लावला.  यावेळी सिंधूनं जपानच्या खेळाडूचीच रणनीती वापरत खेळ केला अन् उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला. 

पहिल्या गेममध्ये यामागूचीनं नेट जवळचा खेळ करताना आघाडी घेतली होती, परंतु सिंधून स्वतःला सावरून जबरदस्त कमबॅक केले. रिओ स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील खेळाडू यामागूचीनंही सुसाट स्मॅशचा खेळ केला. पण, यामागूचीच्या प्रत्येक वार परतावून लावण्यासाठई रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती सिंधू सज्ज होती. सिंधूनं १३-९ अशी आघाडी मजबूत केली. पण, सिंधूकडून अनफोर्स एरर झाले अन् यामागूचीला कमबॅक करण्याचे बळ मिळाले. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगल्या रॅलीचा खेळ पाहायला मिळाला. सिंधूनं जपानच्या खेळाडूला संपूर्ण कोर्टवर नाचवले. यामागूचीनं हाफ स्मॅश चांगला खेळ केला, परंतु सिंधूनं पहिला गेम २१- १३ असा घेतला. ( QUARTER FINALS - Sindhu takes the 1st game 21-13) दुसऱ्या गेमचा पहिला पॉईंट सिंधून वेगवान स्मॅशनं घेतला, परंतु यामागूचीकडून तिला लगेच प्रत्युत्तर मिळाले. सिंधूकडून क्रॉस स्मॅशचा सुरेख खेळ झाला. यामागूच्या एररचाही सिंधूला फायदा झाला. सिंधू व यामागूची यांच्यात रॅलीचा चांगला खेळ रंगलेला पाहून बॅडमिंटन चाहते सुखावले होते. सिंधूनं यामागूचीचा फॉर्म्युला वापरत दमदार खेळ केला अन् जपानची खेळाडू दडपणाखाली गेलेली दिसली. सिंधूनं ११-६ अशी आघाडी घेतली. तिच्या या खेळाडू क्रॉस स्मॅशचा बहारदार होत गेला. जपानच्या खेळाडूची अवस्था पाहून प्रेक्षकांमध्ये बसलेले सहकारी खेळाडूही निराश झालेले दिसले. हिंदी कॉमेंटेटरचं एक वाक्य भारतीय पाठीराख्यांना सुखावत होतं अन् ते म्हणजे, 'सिंधूने अकाने को थकाने का मन बना लिया है!' यामागूचीनं ६ गुणांची पिछाडी तीननं कमी केली ( १५-१२). यामागूचीनं १५-१५ अशी बरोबरी मिळवून कमबॅक केला. ( Brutal, brutal rally. Both were exhausted by the end of it) प्रदीर्घ रॅलीमुळे दोन्ही खेळाडू थकलेल्या पाहायला मिळाल्या. यामागूचीनं १८-१६ अशी आघाडी घेतल्यानं सामन्याची रंजकता अधिक वाढली. पण, सिंधूनंही नेट जवळचा खेळ करताना गेम पुन्हा १८-१८ असा बरोबरीत आणला. यामागूची सामना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होती, तर सिंधू विजयासाठी टक्कर देत होती. मात्र दोन्ही खेळाडू प्रचंड थकल्या होत्या. यामागूची २०-१८ आघाडीवर असताना सिंधूनं दोन गेम मॅच पॉईंट वाचवले अन् २०-२० अशी बरोबरी घेतली. सिंधूनं सलग दोन गुण घेताना हा गेम २२-२० असा जिंकला अन् उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021PV Sindhuपी. व्ही. सिंधू