शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रानं रचला इतिहास; गंभीर म्हणाला, 'त्याचा हात 1.3 अब्ज लोकांच्या सामर्थ्याचे...' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 19:15 IST

Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का? याकडे सर्वांच लक्ष लागले होते, अखेर 130 कोटी भारतीयांचे स्वप्न नीरज चोप्राने पूर्ण केले आहे.

Tokyo Olympic, Neeraj Chopra : टोकियो ऑलम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू  नीरज चोप्राने भारताला पहिले सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले आहे. नीरज चोप्रानं ऐतिहासिक कामगिरी करताना अ‍ॅथलेटिक्समधील १२५ वर्षांचा भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला पहिल्या राऊंडमध्ये ८७.०३ मीटर लांब भाला फेक करत त्याने आघाडी मिळवली. नीरज चोप्रा भारताला यंदाच्या ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देतो का? याकडे सर्वांच लक्ष लागले होते, अखेर १३० कोटी भारतीयांचे स्वप्न नीरज चोप्राने पूर्ण केले आहे. टोकिओ ऑलिम्पिकमधील आणि भालाफेकीत मिळणारे हे भारतातील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

नीरज चोप्राने ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकून हा विजय नोंदवला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर नीरज चोप्रावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सोशल मीडियातून नीरज चोप्राचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच, नीरज चोप्राचे सुवर्णपदक जिंकल्यावर क्रिकेट जगतातील खेळाडूही ट्विट करून नीरज चोप्राचे अभिनंदन करत आहेत. गौतम गंभीरने ट्विट केले, 'त्याचा हात 1.3 अब्ज लोकांच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतो!'. तर विरेंद्र सेहवागने सुद्धा नीरज चोप्राचे अभिनंदन केले आहे. 'तो रॉकेट आहे,  बिलियन्स भारतीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू. नीरज चोप्रा तू चॅम्पियन आहेस, या आनंदाबद्दल तुझे आभारी आहोत', असे विरेंद्र सेहवागने म्हटले आहे.

नीरज चोप्रानं पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर लांब भालाफेक केली. क्रमवारीनुसार त्याला दुसऱ्या क्रमांकावरून स्पर्धेत सुरुवात करावी लागली. ( Neeraj starts with massive 87.03m in 1st attempt. ) रिपब्लिक ऑफ मोल्डोव्हाच्या अ‍ॅड्रीयन मार्डारे हा प्रथम भालाफेकीसाठी आला अन् त्यानं ८१.१६ मीटर लांब भालाफेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरनं सत्रातील सर्वोत्तम कामगिरी करताना ८५.३० मीटर लांब भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्षद नदीमनं पहिल्या प्रयत्नात ८२.४० मीटर लांब भालाफेक केली. चेक रिपब्लिकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ८३.९८ मीटरचे अंतर गाठून पहिल्या फेरीअखेरीस टॉप फाईव्हमध्ये स्थान पक्के केले. नीरजनं अव्वल स्थान टिकवून ठेवले. ( Neeraj Chopra from #TeamIndia is leading after the first round in #Javelin at #Tokyo2020) 

दुसऱ्या प्रयत्नात नीरजनं कामगिरी आणखी उंचावली अन् ८७.५८ मीटर लांब भालाफेकून प्रतिस्पर्धींना गपगार केले. ( Neeraj Chopra second attempt: 87.58) त्याला चिअर करण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सहकारी अन् प्रशिक्षकांनी पदकाचा जल्लोष तेव्हाच सुरू केला. नीरजनं सेट केलेल्या लक्ष्याचा आसपासही प्रतिस्पर्धींना फिरकता आले नाही. पहिल्या प्रयत्नानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ज्युलियनला दुसऱ्या प्रयत्नात ७७.९० मीटर भाला फेकता आला. नीरजची भालाफेक पाहून प्रतिस्पर्धी दडपणात गेलेले दिसले. तिसऱ्या प्रयत्नात मात्र नीरजला ७६.७९ मीटर लांब भालाफेकता आला. चेक प्रजासत्ताकच्या व्हितेझस्लॅव्ह व्हीसलीनं तिसऱ्या प्रयत्नांत ८५.४४ मीटर लांब भाला फेकून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. पाकिस्तानच्या नदीमनं ८४.६२ मीटर लांब भालाफेकून पदकाच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले.  पहिल्या तीन प्रयत्नांनंतर १२पैकी ८ स्पर्धकच पदकाच्या शर्यतीत कायम राहिले आणि त्यात नीरज अव्वल स्थानावर व पाकिस्तानचा नदीम चौथ्या स्थानावर होता. आश्चर्याचा धक्का म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड धारक जर्मनीचा जॉहानेस वेटर हा बाद होणाऱ्या स्पर्धकांमध्ये होता. त्यानं दुसऱ्या व तिसऱ्या प्रयत्नांत फाऊल केले. ( World Record holder Vetter Johannes out of the contest in men's #JavelinThrow #olympics #Tokyo2020). चौथ्या प्रयत्नात नीरजकडून फाऊल झाला. पण तरीही नीरज सुवर्णपदकाचा दावेदारच होता.  चेक प्रजासत्ताकच्या जाकूब व्हॅड्लेचनं ५व्या प्रयत्नात ८६.६७ मीटर अंतर पार करून रौप्यपदकाच्या शर्यतीत धडक मारली. पाकिस्तानचा नदीम पाचव्या स्थानी घसरला. नीरजनं पाचव्या प्रयत्नातही फाऊल केला. पण नीरजला चिंता करण्याचं कारण नव्हतं. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात मारलेली मजल ही त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेशी होती. पाकिस्तानच्या नदीमला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, ८५.६२ मीटर ही त्याची फायनलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

नीरजचा सामना पाहण्यासाठी त्याच्या गावी जय्यत तयारी....

तुम्हाला हे माहित्येय का?आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अजूनही नॉर्मन प्रिचर्ड यांनी पॅरिस ऑलिम्पिक ( १९००) स्पर्धेत २०० मीटर आणि २०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत जिंकलेले पदक हे भारताच्या नावावरच नोंदवले आहे. पण, आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या माहितीनुसार प्रिचर्ड यांनी ग्रेट ब्रिटनचे प्रतिनिधित्व केले होते. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांना अनुक्रमे १९६४ व १९८४च्या ऑलिम्पिक स्पर्धेत थोड्याश्या फरकानं ऑलिम्पिक पदकानं हुलकावणी दिली होती. 

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021