शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आज भारत विरुद्ध चीन लढत, चायनीज बॉक्सर मैमतअलीशी लढण्यास विजेंदर सिंग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 01:06 IST

खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे.

मुंबई : खेळ सर्वांना एकत्रित आणतो आणि तेच काम मी करणार आहे. सध्या भारत आणि चीन यांच्यामध्ये बॉर्डरवर गंभीर वातावरण आहे. परंतु, हा खेळ आहे. जुल्फिकरविरुद्धची लढत भारत विरुध्द चीन अशीच आहे. मी देशासाठी लढणार असून रिंगमध्ये नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास भारताचा स्टार व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंगने व्यक्त केला.व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केल्यापासून सलग आठ लढती जिंकलेला भारताच्या स्टार बॉक्सर विजेंदर सिंग रविवारी सलग नववी लढत जिंकण्याच्या निर्धाराने मुंबईत रिंगमध्ये उतरेल. यावेळी चीनचा अव्वल बॉक्सर जुल्फिकर मैमतअली याला नमविण्याचे कडवे आव्हान विजेंदरपुढे असेल. विशेष म्हणजे दोन्ही बॉक्सर या लढतीमध्ये आपले वैयक्तिक विजेतेपद पणाला लावणार असल्याने या लढतीची उत्सुकता वाढली आहे. या लढतीआधी दोन्ही खेळाडूंचे वजन तपासण्यात आले. यावेळी विजेंदरने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.मुंबईतील वरळी येथील एनएससीआय स्टेडियममध्ये रंगणाºया या लढतीमध्ये भारताचा माजी आॅलिम्पिक कांस्य पदक विजेता विजेंदर आपले डब्ल्यूबीओ एशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वत:कडे ठेवण्यासह जुल्फिकरचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट जेतेपदही मिळवण्यासाठी उत्सुक आहे.विजेंदरने यावेळी म्हटले की, ‘रविवारच्या लढतीसाठी मी पुर्णपणे सज्ज असून मला विजयाचा विश्वास आहे. हा भारत विरुद्ध चीन असा सामना आहे आणि याविषयी अधिक काही बोलण्याची मला गरज नाही. मी खूप उत्साहित असून संपुर्ण देश माझ्या पाठिशी आहे. ही लढत नक्कीच शानदार होईल आणि यामध्ये भारत विजयी होईल. शुक्रवारी माझे वजन ७८ किलो होते. लढतीसाठी वजन ७६.२ किलो असणे आवश्यक होते. त्यामुळे मी काहीच खाल्ले नाही. शनिवारी वजन तपासले तेव्हा ७६ किलो होते. त्यामुळे आता मी भरपूर खाणार आहे.’आपल्या योजनांविषयी विजेंदर म्हणाला की, ‘प्रतिस्पर्धी बॉक्सरच्या खेळानुसार मी माझ्या योजना ठरवेल. मी त्याच्यानुसार खेळ करेल. या लढतीसाठी मी माझ्या तंत्रामध्ये अनेक बदल केले आहेत.’ दरम्यान रविवारी मुंबईत एकूण सात लढती होणार असून यावेळी आॅलिम्पियन अखिल कुमार आणि जितेंदर कुमार व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करतील.......................................मी महाराष्ट्रात याआधी लढलोय, पण मुंबईत पहिल्यांदाच लढणार आहे. आॅलिम्पिक पदक मिलवल्यानंतर पहिल्यांदा मुंबईत आलो होतो. मुंबईकर क्रीडाप्रेमी आहेत. ते खेळावर प्रेम करतात. तिकिट खरेदीवर मुंबईकर खर्च करतात. त्यांचा पाठिंबा माझ्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे.- विजेंदर सिंग............................