शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

वाघाने केली ड्रॅगनची शिकार; चीनच्या मैमतअलीला नमवून विजेंदरने जिंकले दुहेरी जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:47 IST

- रोहित नाईकमुंबई : अत्यंत रोमांचक झालेल्या लढतीत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने चीनच्या झुफिकार मैमतअली याला अपेक्षेप्रमाणे नमवत व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये सलग नववी लढत जिंकली. या शानदार विजयासह विजेंदरने आपल्या डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदाचा बचाव केलाच, मात्र त्याचबरोबर मैमतअलीचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट विजेतेपदही आपल्याकडे हिसकावून घेतले. ...

- रोहित नाईक

मुंबई : अत्यंत रोमांचक झालेल्या लढतीत भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगने चीनच्या झुफिकार मैमतअली याला अपेक्षेप्रमाणे नमवत व्यावसायिक बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये सलग नववी लढत जिंकली. या शानदार विजयासह विजेंदरने आपल्या डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेतेपदाचा बचाव केलाच, मात्र त्याचबरोबर मैमतअलीचे डब्ल्यूबीओ ओरिएंटल सुपर मिडलवेट विजेतेपदही आपल्याकडे हिसकावून घेतले. एकूण दहा फेºयांमध्ये झालेल्या या रोमांचक लढतीमध्ये तिन्ही परीक्षकांनी एकमताने विजेंदरला विजयी घोषित केले. पहिल्या पंचाने विजेंदरच्या बाजूने ९६-९३, दुसºया पंचाने ९५-९४, तर तिसºया पंचाने ९५-९४ गुण दिले.सध्या सुरू असलेल्या भारत - चीन सीमावादामुळे वातावरण गंभीर असताना विजेंदर - मैमतअली या लढतीकडे भारत विरुद्ध चीन असा रंग चढला होता. त्यातच, या लढतीच्याआधी स्वत: विजेंदरने ही लढत भारत विरुद्ध चीन अशी असल्याचे सांगत रणशिंग फुंकले होते. त्यामुळेच शनिवारी रात्री वाघ बाजी मारणार की ड्रॅगन, अशीच चर्चा बॉक्सिंगप्रेमींमध्ये रंगली होती.वरळीतील एनएससीआय स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत पहिल्या फेरीमध्ये दोन्ही बॉक्सर्सने सावध पवित्रा घेऊन एकमेकांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसºया फेरीपासून आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. मैमतअलीच्या आक्रमक चालींना विजेंदरने जोरदार ठोसे लगावून प्रत्युत्तर दिल्यानंतर प्रेक्षकांनी विजेंदरचा जयघोष केला. या वेळी मैमतअली दबावाखाली आला.तिसºया फेरीमध्ये मैमतअलीने विजेंदरच्या कमरेखाली हल्ला केल्याने पंचांनी त्याला समज दिली. या वेळी मैमतअलीच्या धसमुसळ्या खेळापुढे एक वेळ तोल जाऊन विजेंदर खालीही पडला.दरम्यान, विजेंदर मजबूत स्थितीमध्ये दिसत असतानाच सहाव्या फेरीनंतर मैमतअलीने चांगले पुनरागमन केले. परंतु, बचावावर अधिक भर देताना विजेंदरने आपले नियंत्रण गमावू दिले नाही. सातव्या फेरीमध्ये दोन्ही खेळाडूंचा थकवा स्पष्ट दिसू लागला होता. या वेळी, विजेंदरने आक्रमकतेला मुरड घालताना शारीरिक क्षमता कायम राखण्यावर भर दिला. याचाच त्याला शेवटच्या दोन फेºयांमध्ये फायदा झाला.नवव्या फेरीमध्ये मैमतअलीने पुन्हा एकदा कमरेखाली ठोसा मारल्याने विजेंदर खाली पडला. या वेळी, पंचांनी मैमतअलींना दुसरी समज दिली.तसेच, प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवतानाच ‘चीटर... चीटर’ अशा घोषणाही दिल्या. अखेरच्या दहाव्या फेरीत मैमतअली काहीसा आक्रमक दिसला. परंतु, विजेंदरने जबरदस्त नियंत्रण राखताना सलग दोन ठोसे मारत मैमतअलीला दबावाखाली आणले. दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केल्याने सामन्याचा निकाल परीक्षकांवर सोपविण्यात आला. या वेळी परीक्षकांनी एकूण गुणांचा विचार करून विजेंदरला विजयी घोषित केले.ही लढत अपेक्षेहून अधिक चांगली झाली. कधी कधी चायनीज माल जास्त चालतो. पण मी या लढतीचा आनंद घेतला. पाठिंबा दिल्याबद्दल मुंबईकर आणि संपूर्ण देशाचे धन्यवाद. या लढतीत दोघांचेही रक्त निघाले, पण शेवटी आपण जिंकलो. त्याने दोन वेळा कमरेखाली पंच मारले जे अवैध आहेत. यामुळे माझे नियंत्रणही सुटले होते, पण वेळीच मी सावरलो. मी सकारात्मक आहे. पराभवाचा विचार करीत नाही. पहिले सहा फेºया चांगल्या गेल्या. प्रत्येक फेरी जिंकण्यावर भर होता. या खेळाच्या आणखी प्रगती आणि प्रसारासाठी भविष्यात आम्ही भारताच्या इतर शहरांमध्येही लढती आयोजित करू.- विजेंदर सिंग