शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पुण्यात रंगणार ‘भारत श्री’चा थरार; ६००हून अधिक खेळाडू सहभागी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 06:03 IST

पुण्यातील बालेवाडी येथे २३ ते २५ मार्च दरम्यान ‘भारत श्री’ स्पर्धेचा थरार रंगणार असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६००हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होण्याची शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून, यंदा तब्बल ५० लाखांहून अधिक रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर होईल.

मुंबई : पुण्यातील बालेवाडी येथे २३ ते २५ मार्च दरम्यान ‘भारत श्री’ स्पर्धेचा थरार रंगणार असून, या स्पर्धेत देशभरातून सुमारे ६००हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग मिळणार आहे. इतक्या मोठ्या संख्येने खेळाडू सहभागी होण्याची शरीरसौष्ठव खेळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असून, यंदा तब्बल ५० लाखांहून अधिक रोख रकमेच्या बक्षिसांचा वर्षाव विजेत्यांवर होईल.भारतीय शरीरसौष्ठव महासंघ (आयबीबीएफ)च्या वतीने होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष असेल. त्याच वेळी या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून, खेळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच खेळाडू व संघटनेच्या अधिका-यांच्या राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.सांघिक जेतेपदासाठी महाराष्ट्र सज्ज...स्पर्धेच्या सांघिक जेतेपदाचे लक्ष्य बाळगलेल्या महाराष्ट्राची मदार सुनीत जाधव, महेंद्र चव्हाण, सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे यांच्यावर अवलंबून असेल. त्याच वेळी, बलाढ्य रेल्वेचे तगडे आव्हान महाराष्ट्रापुढे असेल. रेल्वेच्या जावेद अली खान, राम निवास, किरण पाटील, सागर जाधव, भास्करन आणि प्रीतम चौगुले यांच्यापुढे महाराष्ट्राच्या शरीररसौष्ठवपटूंना कठोर परिश्रम घ्यावे लागतील.पुणेकरांना पर्वणी...स्पर्धेत सुमारे ४००हून अधिक पुरुष, तर महिला गटात किमान २५ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग अपेक्षित असल्याचे आयोजकांनी म्हटले. याशिवाय फिजिक स्पोटर््स या विशेष गटासाठी मोठ्या संख्येने पुरुष व महिला गटात मॉडेल सहभागी होणार असल्याने पुणेकरांना थरार अनुभवण्याची मोठी पर्वणी लाभली आहे.

24-25 फेब्रुवारी दरम्यान वांद्रे येथे रंगणा-या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेतून राज्य संघाची निवड होईल. सलग पाचव्यांदा किताब पटकावण्याची संधी मुंबईकर सुनीतकडे असून, सर्वांचे लक्ष त्याच्याकडे असेल.यंदाच्या स्पर्धेत गेल्या दोन वर्षांचा विजेता मुंबईकर सुनीत जाधव याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल. कामगिरीतील सातत्य कायम राखत चमकदार हॅट्ट्रिक नोंदवण्याचा त्याचा निर्धार आहे. त्याच वेळी, त्याच्यापुढे सागर कातुर्डे, मि. वर्ल्ड महेंद्र चव्हाण, नितीन म्हात्रे यांच्याकडून कडवी लढत मिळेल. शिवाय उत्तर प्रदेश, सेनादल आणि रेल्वेसारख्या तगड्या संघातील खेळाडूंचेही मुख्य आव्हान सुनीतपुढे राहील.

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा