शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भारत विजयाच्या उंबरठ्यावर, आफ्रिका ८ बाद १५८

By admin | Updated: February 22, 2015 15:58 IST

भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ८ बाद १५८ अशी झाली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. २२ - भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा व उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे दक्षिण आफ्रिकेची अवस्था ८ बाद १५८ अशी झाली आहे.  भारत विजयापासून फक्त दोन विकेट दूर असून वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवण्याचा मोका भारताला मिळाला आहे. 

वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत व दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने आहेत. भारताने दिलेले  भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला उतरली. भारताच्या अवघ्या नऊ धावा झाल्या असताना रोहित शर्मा शून्यावर असताना धावबाद झाला.  धवनने तिस-या क्रमांकावर आलेल्या विराटच्या साथीने भारताचा डाव पुढे नेला. पाकपाठोपाठ आफ्रिकेविरोधातही धवन  - कोहली जोडीने भारताचा डाव सावरला. या जोडीने शतकी भागीदारी रचली. विराट कोहली ४६ धावांवर असताना इम्रान ताहीरच्या फिरकीवर झेलबाद झाला. यानंतर धवन आणि अजिंक्य रहाणे या जोडीने डाव पुढे नेला. शिखर धवनने दिमाखदार शतक ठोकले तर अजिंक्य रहाणेनेही तडाखेबाज अर्धशतक ठोकले. ही जोडी भारताला ३०० चा टप्पा गाठून देईल असे वाटत असतानाच धवन १३७ धावांवर बाद झाला. धवन बाद झाला त्यावेळी भारताची स्थिती ४३.४ षटकांत ३ बाद २६१ अशी होती. सुरेश रैना ६ धावांवर बाद झाला. रहाणेही ७९ धावांवर असताना पायचीत झाला. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८ धावांवर झेलबाद, रविंद्र जडेजा २ धावांवर धावबाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था ७ बाद ३०२ अशी झाली. मोहम्मद शमी आणि आर. अश्विनला आफ्रिकन गोलंदाजांनी फटकेबाजीसाठी संधीच दिली नाही व भारताला ५० षटकांत ३०७ धावाच करता आल्या.  एबी डिव्हिलियर्सच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे रोहित शर्मा व रविंद्र जडेजा हे दोन फलंदाज धावबाद झाले. तर हाशिम आमलाने शिखर धवनला दिलेले जीवदान आफ्रिकेला चांगलेच महागात पडले. आफ्रिकतर्फे मॉर्ने मॉर्कलने दोन तर इम्रान ताहीर, वॅन पार्नेल व डेल स्टेनने प्रत्येकी एक विकेट घेतली. शेवटच्या षटकांत आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना रोखण्यात यश मिळवले.