शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

तीन भारतीयांनी मिळविले पॅराऑलिम्पिकमध्ये स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 04:07 IST

सुंदरसिंग गुर्जर याने खांद्याच्या दुखापतीनंतरही जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये पुरुषांच्या एफ ४६ भालाफेकीत जेतेपदाचा सोमवारी यशस्वीपणे बचाव केला.

दुबई : सुंदरसिंग गुर्जर याने खांद्याच्या दुखापतीनंतरही जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपदमध्ये पुरुषांच्या एफ ४६ भालाफेकीत जेतेपदाचा सोमवारी यशस्वीपणे बचाव केला. गुर्जरसह कांस्य विजेता अजितसिंग आणि रिंकू यांनीही टोकियो पॅरालिम्पिकचा कोटा मिळविला.गुर्जरने ६१.२२ मीटर भालाफेक करीत अव्वल स्थान घेतले. यंदाच्या मोसमातील ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. अजित सिंगने ५९.४६ मीटर भालाफेक करीत तिसरे आणि रिंकूने चौथे स्थान घेतले. आंतरराष्टÑीय पॅरालिम्पिकच्या नियमानुसार जागतिक पॅरा अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपदच्या प्रत्येक स्पर्धेत पहिल्या चार स्थानावरील खेळाडू टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील.२३ वर्षांच्या गुर्जरने येथे लंडन २०१७ च्य विश्व स्पर्धेत मिळविलेल्या जेतेपदाचा बचावच केला नाही, तर जागतिक अजिंक्यपदमध्ये दोन पदके मिळविणारा तो दुसरा भारतीय खेळाडूही बनला. देवेंद्र झझारियाने २०१३ च्या लियोन व २०१५ च्या दोहा स्पर्धेत सुवर्ण व रौप्य जिंकले होते.गुर्जर पाचव्या प्रयत्नांपर्यंत दुसऱ्या स्थानावर होता. सहाव्या प्रयत्नात ६१.२२ मीटर भालाफेक करीत त्याने लंकेचा दिनेश् हेराथ याला मागे टाकले. लंकेच्या खेळाडूने पहिल्या प्रयत्नात ६०.५९ मीटर भालाफेक केली होती. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य जिंकले आहे.