शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

तिसरा एकदिवसीय सामना : भारताचा विजयी आघाडीचा निर्धार

By admin | Updated: June 29, 2017 20:33 IST

तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे.

ऑनलाइन लोकमत

अँटिग्वॉ, दि. 29 - आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या वन डेत आज शुक्रवारी कमकुवत वेस्ट इंडिजला पुन्हा एकदा धूळ चारून २-० ने विजयी आघाडी घेण्याच्या निर्धारासह मैदानात उतरणार आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार सामना सायंकाळी ६.३०पासून खेळला जाईल.पोर्ट आॅफ स्पेनचा दुसरा सामना भारताने १०५ धावांनी जिंकला तर पहिला सामना ३९ षटकांचा खेळ झाल्यानंतर पावसामुळे रद्द करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या भारताच्या तीन आघाडीच्या फलंदाजांनी दमदार फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनी देखील अचूक मारा करीत वेस्ट इंडिजमध्ये आतापर्यंतचा सर्वांत मोठा विजय मिळवून दिला होता. भारताने ५ बाद ३१० धावा उभारल्या पण त्यात धोनी आणि युवराजचे योगदान नव्हते. तिसऱ्या सामन्यात या दोघांकडून धावांची अपेक्षा असेल. युवा अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि केदार जाधव यांच्या उपस्थितीमुळे फलंदाजी आणखी भक्कम मानली जाते. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन हा देखील चांगली फलंदाजी करू शकतो.गोलंदाजीचा भार भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर असून फिरकीची जबाबदारी अश्विनसोबत कुलदीप यादव सांभाळणार आहे. कुलदीपने दुसऱ्या सामन्यात ५० धावांत तीन गडी बाद केले होते. रवींद्र जडेजाचा संघात समावेशहोतो का, हे पाहणे रंजक ठरेल. कोहली, युवी, धवन आणि पंड्या यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला नेट आणि जिममध्ये चांगलाच घाम गाळला. भारत येथे कमकुवत संघाविरुद्ध खेळत असला तरी श्रीलंका आणि द. आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीने हा अनुभव सकारात्मक ठरणार आहे.मालिकेत ०-१ ने माघारल्यानंतर विंडीजने केली होप आणि सुनील एम्ब्रिस यांना जोनाथन कार्टर आणि केसरिक विलियम्स यांच्याऐवजी स्थान दिले. या दोन्ही खेळाडूंकडून यजमान संघाला बऱ्याच आशा आहेत. विंडीज संघ पहिल्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळविण्यात अपयशी ठरला होता.उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराजसिंग, महेंद्रसिंग धोनी (यष्टिरक्षक), केदार जाधव, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, उमेश यादव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, रिषभ पंत.वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), सुनील एम्ब्रिस, देवेंद्र बीशू, रोस्टन चेज, मिगुएल कमिन्स, केली होप, शाय होप, अल्जारी जोसेफ, एव्हिन लुईस, जेसन मोहम्मद, अ‍ॅश्ले नर्स, कीरोन पॉवेल, रोवमॅन पॉवेल.