शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
4
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
5
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
6
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
7
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
8
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
9
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
10
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
11
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
12
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
13
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
14
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
15
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
16
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
18
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
19
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
20
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू

आफ्रिदीच्या "ड्रीम टीम"मध्ये एकच भारतीय, न्यूझीलंड-इंग्लंडच्या खेळाडूंना स्थान नाही

By admin | Updated: June 5, 2017 18:24 IST

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काल आपल्या वनडेच्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी, सौरव गांगुली...

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 6 - पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काल आपल्या वनडेच्या ड्रीम टीमची घोषणा केली आहे. त्याच्या ड्रीम टीममध्ये भारताचा माजी कर्णधार एम.एस. धोनी, सौरव गांगुली तसेच सध्याचा कर्णधार विराट कोहलीला स्थान मिळाले नाही. शाहिदने आपल्या संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला विशेष स्थान दिले आहे. शाहिदच्या संघात सचिन हा एकमेव भारतीय चेहरा आहे. शतकांच्या बादशहाला आपल्या संघात तो सलामीवीर म्हणून खेळवण्यास इच्छुक दिसतोय. सचिन तेंडुलकरने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात ही मधल्या फळीतील फलंदाज म्हणून केली होती. त्यानंतर त्याने भारताकडून सलामीवीर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. सचिनसोबतच आफ्रिदिने श्रीलंकेच्या कुमार संगकाराला यष्टीरक्षक म्हणून पसंती दिली असून गोलंदाजीमध्ये त्याने सहकारी वासीम आक्रम आणि ऑस्ट्रेलियन फिरकीपटू शेन वार्नचा समावेश संघात केले आहे. शाहिद आफ्रिदीच्या ड्रीम टीममध्ये ऑस्ट्रेलियाच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. वेस्ट इंडिज दोन, पाकिस्तान दोन आणि दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारताच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. आफ्रिदीच्या ड्रीम टीममध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या एकाही खेळाडूचा समावेश नाही हे विशेष... अशी आहे आफ्रिदीची ड्रीम टीम सचिन तेंडुलकर (भारत), अ‍ॅडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया), रिकि पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया) ब्रायन लारा (वेस्ट इंडिज), इंजमाम उल हक (पाकिस्तान), कुमार संगकारा (श्रीलंका), जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका), वासिम आक्रम (पाकिस्तान), शेन वार्न (ऑस्ट्रेलिया), ग्लेन मॅग्रा (ऑस्ट्रेलिया), कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडिज)

आणखी वाचा : व्हिट्टोरीच्या ड्रीम टीममध्ये धोनीला स्थान नाही, विराट कर्णधार 

 

आफ्रिदीने 398 सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.  अष्टपैलू आफ्रिदीच्या नावावर 8084 धावा आहेत. यामध्ये 6 शतकांचा आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. फलंदाजीशिवाय आफ्रिदीने गोलंदाजीमध्ये 395 बळी मिळवले आहेत.