शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टीवर हिरवळ नसेल : क्युरेटर

By admin | Updated: November 15, 2016 01:20 IST

राजकोट कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर आता सर्वांची नजर विशाखपट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर केंद्रित झाली आहे.

विशाखापट्टणम : राजकोट कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर आता सर्वांची नजर विशाखपट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर केंद्रित झाली आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीवर अधिक हिरवळ राहणार नसल्याचे बीसीसीआयचे क्युरेटर कस्तुरी श्रीराम यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवसापासून येथे चेंडू वळतील, असेही त्यांनी सांगितले.पहिल्या कसोटी सामन्यात खेळपट्टी फिरकीला अनुकूल न ठरल्यामुळे भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन आश्विनला छाप पाडता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाला अनुकूल खेळपट्टी तयार करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याचा आश्विनला लाभ मिळेल.राजकोटप्रमाणे येथेही प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत आहे. याच मैदानावर भारताने न्यूझीलंडला पाचव्या व अखेरच्या लढतीत ७९ धावांत गुंडाळून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-२ ने विजय मिळविला होता. एसीएचे सचिव व बीसीसीआयचे उपाध्यक्ष गोकाराजू गंगराजू यांनी सावध प्रतिक्रिया देताना सांगितले, ‘‘आम्ही स्पोर्टिंग खेळपट्टी तयार केली आहे. यात उभय संघांना समान संधी असेल. आम्हाला निकालाची अपेक्षा आहे.’’ येथील खेळपट्टी वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत होती. राजस्थानने रणजी ट्रॉफी लढतीत दुसऱ्या डावात आसामचा ६९ धावांत धुव्वा उडवला होता. ही लढत तीन दिवसांमध्ये संपली होती.गंगराजू म्हणाले, ‘‘कसोटी खेळपट्टीची तुलना रणजी सामन्याच्या खेळपट्टीशी करायला नको. आसामविरुद्धच्या लढतीतील खेळपट्टी वेगळी होती आणि संवाद नसल्यामुळे हे घडले होते.’’न्यूझीलंडविरुद्धच्या वन-डे लढतीबाबत ते म्हणाले, ‘‘भारत-न्यूझीलंड लढतीदरम्यान खेळपट्टीमध्ये थोडा ओलावा होता; पण फलंदाजाच चुकीच्या पद्धतीने बाद झाले.’’फिरकीला अनुकूल खेळपट्टी राहणार असल्याचे संकेत मिळत असल्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल. कारण राजकोटमध्ये पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंनी वर्चस्व गाजवून आपला निर्धार स्पष्ट केला आहे. मोईन अली, आदिल राशीद व जफर अन्सारी या इंग्लंडच्या फिरकी त्रिकुटाने १३ बळी घेतले होते. (वृत्तसंस्था)