शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
5
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
6
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
7
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
8
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
9
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
10
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
11
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
12
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
13
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
14
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
15
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
16
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
17
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
18
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
19
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
20
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   

...तर भारत पोडियमवर दिसेल- जावेद शेख

By admin | Updated: July 29, 2016 01:27 IST

भारतीय संघाची सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून आॅलिम्पिकमध्ये सहज उपांत्य फेरी गाठेल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ पोडियमवर आपले स्थान निश्चित

- महेश चेमटे,  मुंबई

भारतीय संघाची सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून आॅलिम्पिकमध्ये सहज उपांत्य फेरी गाठेल. आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवल्यास भारतीय संघ पोडियमवर आपले स्थान निश्चित पक्के करेल, असा विश्वास रिओ आॅलिम्पिकसाठी निवड झालेले एकमेव भारतीय पंच जावेद शेख यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला. विशेष म्हणजे मुंबईकर असलेले जावेद यांच्याव्यतिरीक्त चीनचे चँन डि कँग यांचीही आॅलिम्पिकसाठी निवड झाली असून आशिया खंडातून हे दोघेच रिओमध्ये पंच म्हणून दाखल होणार आहेत.भारतीय हॉकी संघाविषयी जावेद म्हणाले, ‘‘एकेकाळी भारताचा हॉकीमध्ये दबदबा होता. मात्र युरोपियन देशांना हॉकीत सहज प्रवेश मिळावा यासाठी हॉकी अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळविण्यात आली. माती - गवत अशा मैदानावर खेळणे आणि टर्फवर खेळणे यात फरक असतो. त्याचा फटका भारताला बसल्याने आपल्या वर्चस्वालाउतरती कळा लागली. मात्र विद्यमान टीम इंडिया परिपूर्ण संघ असून प्रत्यक्ष सामन्यात सर्वोत्कृष्ट खेळ केल्यास भारत नक्कीच सुवर्णपदकाला गवसणी घालेल.’’४० वर्षीय जावेद शेख यांनी राष्ट्रकुल, विश्वचषक स्पर्धेत अचूक निर्णयाच्या जोरावर मैदाने गाजवली आहेत. हॉकीच्या बॅडपॅच बाबत सांगताना शेख म्हणाले, ‘‘म्युनिक आॅलिंपिकमध्ये हॉकी ग्रासवर न करता अ‍ॅस्ट्रोटर्फवर खेळविण्यात आली. भारतीयांना याची सवय नसल्याने मोठा फटका बसला. त्यामुळे भारतीय हॉकी ला उतरती कळा लागली. याला मॉस्कोतील सुवर्णपदक विजेता संघ केवळ अपवाद आहे. पण आता काळ बदलला असून पुन्हा एकदा आपण वर्चस्व मिळवू शकतो.’’ ‘‘भारतीयांसाठी ‘बचाव’ नेहमीच दुखरी बाजू ठरली आहे. मात्र सध्या हीच बाजू टीम इंडियाचे बलस्थान आहे. शिवाय फॉरवर्ड लाईन, आक्रमण यामध्येही संघ सरस आहे. त्यामुळेच, बऱ्याच कालावधीनंतर एक परिपूर्ण संघ रिओत खेळेल. त्यामुळेच या संघाकडून पदकाची अपेक्षा करणे गैर ठरणार नाही,’’ असेही शेख यांनी सांगितले. मुंबई पोर्टचा ‘ट्रस्ट’ सार्थ ठरवणारहॉकीमध्ये खेळाडूंपेक्षा पंच अधिक तंदुरुस्त असावा लागतो. त्यामुळे साहजिकंच खर्च वाढतो. मदत मिळवण्यासाठी माझ्या सरावाचा आणि प्रवासाचा संपूर्ण तपशील सरकारकडे सादर केला होता. मात्र आमच्याकडे केवळ खेळाडूंना रक्कम देण्याची तरतूद असल्याचे सांगून अर्ज फेटाळण्यात आला. त्यांनतर मी मुंबई पोर्ट ट्रस्टकडे अर्ज सादर केला आणि त्यांनी तातडीने दखल करत मला मदत केली. म्हणूनच मी आज रिओसाठी जावू शकल, असे जावेद यांनी ‘लोकमत’ला सांगितले.आतापर्यंत आॅलिंपिकला गेलेले भारतीय पंचरघु प्रसाद, बंगळूरु (लंडन आॅलिंपिक २०१२)सतिंदर शर्मा, पंजाब (सिडनी आॅलिंपिक २०००, अ‍ॅथेन्स आॅलिंपिक २००४, बीजिंग आॅलिंपिक २००८)सरदार सिंग आणि श्रीजेश हे दोघेही उत्तम असुन दोघांमध्येही संघहित जोपासण्याचा गुण आहे. मुळात हॉकीमध्ये कर्णधार हा नाममात्र असतो. शिवाय गेली तीन-चार वर्षांच्या तुलनेत सध्याचा भारतीय संघ एकत्र खेळत आहे. त्यामुळे संघात योग्य ताळमेळ आहे. त्यामुळे कर्णधार बदलल्याचा विशेष फरक पडणार नाही.- जावेद शेख