शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...तर आॅस्ट्रेलियाचे २०० क्रिकेटपटू होतील बेरोजगार

By admin | Updated: June 30, 2017 00:53 IST

आॅस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मैदान आणि मैदानाबाहेरील परिस्थिती गंभीर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून सुरुवातीलाच बाहेर होणाऱ्या या देशातील २०० क्रिकेटपटूंवर बेरोजगारीचे संकट घोंघावत आहे.

सिडनी : आॅस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मैदान आणि मैदानाबाहेरील परिस्थिती गंभीर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतून सुरुवातीलाच बाहेर होणाऱ्या या देशातील २०० क्रिकेटपटूंवर बेरोजगारीचे संकट घोंघावत आहे. १ जुलैपासून सिनियर खेळाडू बेरोजगार होऊ शकतात, असे आॅस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष ग्रेग डायर यांचे मत आहे.क्रिकेट आॅस्ट्रेलिया आणि देशातील आघाडीच्या खेळाडूंमधील सध्याच्या कराराची मुदत आज ३० जून रोजी संपणार आहे. आतापर्यंत नव्या करारावर स्वाक्षरी झालेली नाही. यावर डायर यांचे मत असे की, करारातील आवश्यक बाबींची पूर्तता झालेली नाही. खेळाडूंसाठी जे करता येईल, ते करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत.सीएने आज सर्वच खेळाडूंना औपचारिक पत्र पाठवून दीर्घकाळ सुरू असलेल्या वादावर निर्णय न झाल्यास आपण बेरोजगार होऊ शकाल, असा इशारा दिला आहे. यादरम्यान आॅस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू याच आठवड्यात आपल्या लोकप्रियतेचा अधिकार परदेशात विकता येऊ शकतो काय, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे सीएचे हाय परफॉर्मन्स मॅनेजर पॅट हॉवर्ड यांनी सर्व खेळाडूंना अन्य देशातील टी-२० लीग खेळण्यासाठी बोर्डाची परवानगी घ्यावी लागेल, असे कळविले आहे.कराराच्या वाटाघाटी होत नसल्याने आॅस्ट्रेलियाचा आगामी आॅगस्टमधील दोन कसोटी सामन्यांचा दौरा आणि त्यानंतर नोव्हेंबरमधील अ‍ॅशेस मालिकेच्या आयोजनावर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे. मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, १ जुलै रोजी करारावर तोडगा न निघाल्यास आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंना विदेशातील लीगवर विसंबून राहावे लागेल. सीएने मात्र खेळाडूंना इशारा देत प्रतिस्पर्धी प्रायोजकांसोबत करार केल्यास करार मिळणार नसल्याचे म्हटले आहे. खेळाडू आणि सीए यांच्यात सुरू असलेल्या ताठर भूमिकेवरून एक बाब मात्र स्पष्ट आहे ती म्हणजे खेळाडू आर्थिक लाभ वाटण्याच्या नव्या प्रस्तावाला पाठिंबा देणार नसतील तर सीएदेखील त्यांच्यापुढे शरण येण्यास तयार नाही. (वृत्तसंस्था)