शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

वृत्त, वल्ली आणि व्यक्ती: ‘चेकमेट’ची राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 08:06 IST

कपिलदेवची झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद १७५ धावांची निर्णायक खेळी आठवते का? त्या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद १७ धावा अशा प्रतिकूल स्थितीतून भरारी घेत झिम्बाब्वेला तर नमवलेच

रोहित नाईक, वरिष्ठ उपसंपादककपिलदेवची झिम्बाब्वेविरुद्धची नाबाद १७५ धावांची निर्णायक खेळी आठवते का? त्या खेळीच्या जोरावर भारताने ५ बाद १७ धावा अशा प्रतिकूल स्थितीतून भरारी घेत झिम्बाब्वेला तर नमवलेच, पण विश्वचषकालाही गवसणी घातली. अगदी अशीच निर्णायक खेळी... अर्थात ‘चाल’ चेन्नईतील बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पाहण्यास मिळाली. निर्णायक चालीच्या जोरावर भारतीय महिला संघाने स्पर्धेच्या ४४ वर्षात पहिल्यांदाच पदक जिंकताना कांस्य पदक मिळवले. ती निर्णायक चाल खेळली होती दिल्लीची तानिया सचदेवने हंगेरीविरुद्धच्या चौथ्या फेरीत कर्णधार कोनेरु हम्पीसह द्रोणावली हरिका व आर. वैशाली यांना आपापल्या सामन्यात बरोबरी मान्य करावी लागली होती. परंतु, तानियाने झोका गाल हिचा शानदार पराभव केला आणि भारताला विजयी केले. नंतर भारतीयांनी कांस्य पदक निश्चित करत इतिहास घडवला. 

तानियाला वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी बुद्धिबळाची आवड लागली ती आई अंजू यांच्यामुळे. के. सी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरविले. आशियाई ज्युनिअर्सचे जेतेपद पटकावत तानिया प्रसिद्धीझोतात आली. तिचे सौंदर्य पटावरील मोहऱ्यांना भावत असावे, अशा सादगीने ती समोरच्यालाही ‘चेकमेट’ करत सुटते. 

तानियाचे यश २००६,२००७ राष्ट्रीय महिला प्रीमियर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद२००७ आशियाई अजिंक्यपद२००९ अर्जुन पुरस्कार सन्मानित२०१६ महिला राष्ट्रकुल चॅम्पियन२००८ भारतीय बुद्धिबळ ऑलिम्पियाड संघात२०१२ महिला बुद्धिबळ ऑलिम्पियाड बोर्ड-३ मध्ये वैयक्तिक कांस्य २०१५ आशियाई महिला रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदक२०१९ राष्ट्रकुल महिला बुद्धिबळ जेतेपद२०२२ फिडे ऑलिम्पियाड सांघिक कांस्य पदक

टॅग्स :Chessबुद्धीबळ