शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं...! आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत खेळणार

By admin | Updated: May 7, 2017 13:16 IST

आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत खेळण्याचा भारतीय संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी भारतीय संघाला हिरवा कंदील

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 7 - आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत खेळण्याचा भारतीय संघाचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी भारतीय संघाला हिरवा कंदील दिला आहे.  आज रविवारी आयोजित विशेष आमसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. येत्या दोन दिवसात संघ जाहीर करू, संघनिवडीसाठी निवड समितीची बैठक 8 मे रोजी होईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं. 

आयसीसीच्या नव्या आर्थिक मॉडेलमध्ये महसुलीत मोठा वाटा मिळावा यासाठी दबावतंत्राचा वापर म्हणून जगातील सर्वांत श्रीमंत मानल्या जणाऱ्या बीसीसीआयने संघ पाठविण्याची २५ एप्रिलची ‘डेडलाइन’देखील पाळली नव्हती. आयसीसीने बीसीसीआयचा वाटा ५७ लाख डॉलरवरून कमी करून २९.३ लाख डॉलरवर आणला आहे.आमसभेपूर्वी शनिवारी सीओएने राज्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली होती. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास संभाव्य गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रशासकांच्या (सीओए) समितीने बीसीसीआयला दिला होता.  

एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवड करण्यास हेतुपुरस्सर विलंब करीत असलेल्या बीसीसीआयची कानउघाडणी करीत प्रशासकांच्या समितीने (सीओए) लवकरात लवकर संघ निवड करण्याचे निर्देश दिले होते. सीओएने सर्व पदाधिकाऱ्यांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये संघ निवड टाळल्यामुळे बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होत असल्याचे सूचित केले. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे प्रतिनिधित्व करणारा संघ पाठविण्याची अखेरची तारीख २५ एप्रिल होती, पण संघाची अद्याप निवड झाली नाही, हे आपणा सर्वांना माहिती आहे. निवड समितीची त्वरित बैठक बोलवून संघ निवडा.भारतीय संघ जगात सर्वोत्कृष्ट आहे, हे लक्षात असू द्या. स्पर्धेतून माघार घेण्याआधी याचा विचार करा. बीसीसीआयची प्रतिमा नकारात्मक होऊ देण्याऐवजी टीम इंडियाच्या भल्यासाठी काम करा. खेळाडूंचे हित सर्वतोपरी असल्याचे भान ठेवा, असे सीओएने पत्रात म्हटले होते.