शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

Thank You Roger Federer: टेनिसला अलविदा करताना रॉजर फेडररला अश्रू अनावर; पाहा निरोपाचा क्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 11:46 IST

Roger Federer: टेनिस चाहत्यांनी तुडुंब भरलेलं लंडनचं दी ओ-२ अरिना इनडोअर टेनिस कोर्ट...लाइट्सचा झगमगाट आणि निमित्त होतं लॅव्हर कप!

- मोरेश्वर येरम

Roger Federer: टेनिस चाहत्यांनी तुडुंब भरलेलं लंडनचं दी ओ-२ अरिना इनडोअर टेनिस कोर्ट...लाइट्सचा झगमगाट आणि निमित्त होतं लॅव्हर कप! पण यावेळीचा लॅव्हर कपचा सामना आजवरच्या सामन्यांपेक्षा खूप वेगळा होता. कारण आजचा सामना जय-पराजयाच्या पलिकडचा होता. टेनिसचा सम्राट आज आपल्या कारकिर्दीचा अखेरचा सामना खेळत होता. टेनिसच्या पंढरीतील 'माऊली'चं रुप डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी प्रेक्षकरुपी वैष्णवांचा मेळा आज फेडरर...फेडरर नावाचा अखंड जप करत होता. 

तो आला..नेहमीचीच शांत आणि नम्रता त्याच्या चेहऱ्यावर होती. खांद्यावर टेनिस कीट आणि नेहमीच्याच स्टाइलमध्ये स्मितहास्य करत एक हात वर करुन चाहत्यांचं अभिवादन स्विकारलं. दुसऱ्या बाजूला ज्याच्या विरोधात आपण आजवर कडवी टक्कर देत आलो आज त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याला सेंडऑफ द्यायचाय असं एक वेगळंच फिलिंग घेऊन राफेल नदाल कोर्टवर दाखल झाला. फेडररचं टेनिस कोर्टवर असणं, त्याचा खेळ अखेरचा डोळेभरुन पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. फेडररच्या प्रत्येक फटक्यावर टाळ्यांचा कडकडाट होताच. पण रॉजरला आता असं खेळताना यापुढे पाहायला मिळणार नाही याची खदखदही चाहत्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. 

आपल्या करिअरमध्ये १०० हून अधिक टायटल्स जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या फेडररने शेवटचा सामना गमावला खरा, पण टेनिसपटू म्हणून आणि माणूस म्हणून त्यांनी काय आणि किती कमावलं आहे याची प्रचिती पुढच्या काही मिनिटांमध्ये आली. नदालच्या डोळ्यातले अश्रू, जोकोविचचं गहिवरणं, स्टेडियममधील प्रत्येकानं दिलेलं स्टँडिंग ओव्हेशन आणि फेडररचं भाषण ऐकताना जगभरातील चाहत्यांचे पाणावलेले डोळे हे चित्र अद्भुत आणि बोलकं होतं. आज प्रतिस्पर्धी नव्हे, तर 'खेळ' जिंकला होता. अवघं कोर्ट भावूक झालं होतं.

निरोपाच्या भाषणात फेडरर आपल्या भावना व्यक्त करताना प्रचंड भावूक झालेला आज चाहत्यांनी पाहिलं. त्याची पत्नी आणि मुलंही भावूक झालेली पाहायला मिळाली. रॉजरनं सर्वांचे आभार मानले. "आजचा दिवस खरंच खूप छान होता. मी आज दु:खी नाही, तर आनंदी आहे", असं बोलत फेडरर आपल्या भावना आवरत असल्याचं स्पष्ट दिसून येत होतं. आपल्या अखेरच्या सामन्यातही चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत राहिल याचाच जणू तो प्रयत्न करत होता. सर्व सहकारी खेळाडूंचे, प्रेक्षकांचे त्यानं आभार मानले आणि अखेर त्यानं अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. 

साश्रूपूर्ण नयनांनी फेडररनं आपलं बोलणं सुरूच ठेवलं. सर्वांचं कौतुक आणि आभार व्यक्त करण्याची अखेरची संधी त्याला गमवायची नव्हती. "मला जसं फेअरवेल हवं होतं अगदी तसं मला मिळालं. मला लॅव्हर कप खेळायला आवडतं. इथं उपस्थित सर्वच हरहुन्नरी आहेत. जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंचा सहकारी खेळाडू म्हणून मी खेळलो आणि प्रतिस्पर्धी देखील उत्तम खेळले. त्यांचंही मी अभिनंदन करतो", असं रॉजर फेडरर म्हणाला. त्यानंतर टाळ्यांचे इमले प्रेक्षक रचल होते आणि फेडरर मान खाली घालून अश्रूंच्या रुपात आपल्या भावना न बोलता व्यक्त करत होता. फेडररनं आजवर टेनिस जगताला आठवणीत राहतील असे असंख्य सामने दिलेत. आज जाताजाता फेअरवेल सामनाही त्यानं स्पेशल ठरवला. थँक्यू फेडरर!

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररTennisटेनिस