शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

संघ अजूनही समतोल नाही : धोनी

By admin | Updated: October 26, 2015 23:09 IST

सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्थिर आणि संतुलित संघ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेमकी याच गोष्टीची आमच्या संघात कमतरता असल्याचे दिसत आहे

मुंबई : सातत्यपूर्ण कामगिरीसाठी स्थिर आणि संतुलित संघ असणे अत्यंत महत्त्वाचे असते. नेमकी याच गोष्टीची आमच्या संघात कमतरता असल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आपली निराशा व्यक्त केली. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर मालिकाही गमावल्यानंतर धोनीने आपले मत व्यक्त केले.सामन्यात नेमकी चूक कुठे झाली, असे विचारले असता धोनी म्हणाला, की हा प्रश्न आज नका विचारू. साडेचारशेच्या जवळपास धावा बनल्यानंतर हा प्रश्न विचारला गेला नाही पाहिजे. सामन्यात अनेक झेल सुटले, तसेच गोलंदाजीमध्येही खूप चुका झाल्या. २०-२५ षटकांपर्यंत आम्ही सामना नियंत्रित राखला होता. मात्र यानंतर तुफान वेगाने धावा फटकावल्या गेल्या. फलंदाजीबाबत धोनी म्हणाला, की ४३८-४४० लक्ष्य निश्चित सोपे नसते. आफ्रिकेने चांगली फलंदाजी केली. आम्हीदेखील भागीदारी करायला पाहिजे होती. मात्र प्रत्येक वेळी यश मिळत नाही.दरवेळी फलंदाजीच्या क्रमवारीत केलेल्या बदलामुळे टीकेला सामोरे जावे लागलेल्या धोनीने याबाबतीत म्हटले, की मैदान, खेळपट्टी आणि स्थिती यानुसार बदल करावे लागतात. फलंदाजीला बळकटी आणण्यासाठी मी क्रमवारीत बदल केले होते. सध्या आपल्याकडे अधिक वेळ असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दबावाचा यशस्वीपणे सामना करू शकतील, असे खेळाडू निवडण्याची गरज आहे. सामना हरल्यानंतर खेळपट्टीवर टीका करणे हे नित्याचेच झाले आहे. ज्या खेळपट्टीवर आफ्रिकेने धावांचा हिमालय उभा केला, त्याच खेळपट्टीवर भारताचे शेर मात्र ढेर झाले. या खेळपट्टीवर टीका करताना कर्णधार धोनी म्हणाला, की ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक होती. येथे फिरकीपटूंसाठी कोणताही टर्न मिळत नव्हता. येथे आमचे फिरकी आणि वेगवान गोलंदाज दोघेही अपयशी ठरले. यामुळे चौकार व षटकारांवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आणि त्यामुळेच इतका मोठा स्कोअर उभा राहिला. आपल्याला जोहान्सबर्ग किंवा इतर ठिकाणी टर्निंग खेळपट्टी मिळणार नाही. आपली ताकद वेगळी असून त्यानुसारच खेळपट्टी व्हायला हवी.प्लेसिसचे शतक सर्वोत्कृष्ट : डीव्हिलियर्समुंबई : तुफान फटकेबाजी करून भारतीय गोलंदाजी फोडून पाचव्या एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढल्यानंतरही दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डीव्हीलियर्स याने फाफ डू प्लेसिसच्या शतकाला सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. प्लेसिसच्या शतकामुळे इतर फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली. सामन्यात राखलेल्या एकहाती वर्चस्वानंतर आपल्या संघाचे कौतुक करताना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजी क्रमवारी आणि गोलंदाजी क्रमवारी आमच्या संघात असल्याचे त्याने सांगितले.रविचंद्रन आश्विन आंतरराष्ट्रीय स्तराचा गोलंदाज आहे. त्याच्या दुखापतीमुळे निश्चितच भारताला मोठा फटका बसला. निर्णायक सामन्यात त्याची कमी भारताला नक्की जाणवली असेल. त्याचबरोबर मॉर्नी मॉर्केलची अनुपस्थिती आम्हाला खूप जाणवली. त्याची दुखापत आमच्यासाठी मोठा धक्का आहे.- एबी डीव्हीलियर्स, द. आफ्रिका - कर्णधार