शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

टीम इंडियाने मोकळेपणाने खेळावे

By admin | Updated: March 25, 2016 01:59 IST

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच

- सौरव गांगुली लिहितो़...

देवाने आपला वरदहस्तच टीम इंडियावर ठेवला आहे, असेच बुधवारच्या विजयानंतर म्हणावे लागेल. बांगलादेशचा पराभव कल्पनेपलीकडचा होता. ड्रेसिंग रूममध्ये त्यांची टीम नक्कीच स्तब्ध झाली असेल. खेळपट्टीवर जम बसलेले दोन फलंदाज असताना तीन चेंडंूत दोन धावा काढता न येणे, हे न पटण्यासारखे आहे. दुसरा चौकार काढल्यानंतर त्यांनी केवळ एकेरी धाव काढायला हवी होती आणि धोनीने केलेल्या क्षेत्ररक्षणाची रचना पाहता ते सहज शक्य होते. त्यामुळे धावसंख्या बरोबरीत आली असती व धोनीला क्षेत्ररक्षकांना जवळ आणणे भाग पडले असते. शेवटच्या चेंडूपर्यंत हिमतीने झुंज दिल्याबद्दल भारतीय संघ, धोनी व पांड्याला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. स्पर्धेमध्ये अद्याप भारतीय फलंदाज चमक दाखवू शकलेले नाहीत, हे मात्र मान्य करायलाच हवे. भारताचे सामने जिथे झाले त्या तीनही खेळपट्ट्यांवरील फिरकी आश्चर्यजनक होती. चेंडू फिरकी घेईल, अशा खेळपट्ट्या बनवण्याच्या सूचना दिल्याचा संशय व्यक्त होत आहे, पण त्यात तथ्य नाही. कोलकाताच्या बाबतीत मी ठामपणे सांगतो, की पाऊस पडल्याने अतिरिक्त ओलाव्यामुळे चेंडू फिरकी घेऊ लागला. ग्राउंड्समननी फलंदाजीला पोषक खेळपट्ट्या तयार करण्याच्या अतिउत्साहात कोरड्या खेळपट्ट्या तयार केल्या. त्यामुळे चेंडू इतका वळत होत असल्याचे मला वाटते. बुधवारी भारतीय फलंदाजीचा क्रम तात्पुरत्या स्वरूपाचा होता. रोहित व शिखरच्या फॉर्मबद्दल बरीच चर्चा होती, मात्र माझे मत वेगळे आहे. ते न्यूझीलंड व पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले होते आणि टी-२० क्रिकेटमध्ये असे होत असते. त्यांनी वृत्तपत्र वाचणे बंद करून मुक्तपणे खेळले पाहिजे. कदाचित खेळपट्टीमुळे ते मुक्तपणे खेळू शकत नसतील, पण मोहालीतील चांगल्या खेळपट्टीवर ही स्थिती बदलू शकेल. चांगल्या टणक खेळपट्ट्या फलंदाजांसाठी लाभदायक ठरू शकतील. भारताने विजय खेचून आणला, पण मला त्यांची कामगिरी फारशी प्रभावी वाटली नाही. घरच्या मैदानांवर विश्वचषक खेळणे सोपे नाही, पण काही वेळा चाहत्यांच्या अपेक्षांमुळे कामगिरी उंचावते. त्यामुळे भारताने दबावाखाली न येता खेळाचा आनंद घेतला पाहिजे. या संघात काही उत्तम फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, फक्त त्यांनी मोकळेपणाने खेळणे गरजेचे आहे. धोनीने सुरुवातीच्या फळीत फलंदाजीला यावे, असे मत मी अनेकदा व्यक्त केले आहे. तो सहाव्या क्रमांकावर येणे पसंत करतो, मात्र युवराज व रैना अद्याप चौथ्या क्रमांकावर क्षमतेनुसार खेळलेले नसल्याने कदाचित आॅस्ट्रेलियाविरुद्ध धोनीला फलंदाजीच्या क्रमवारीतील स्वत:चे स्थान बदलावे लागेल. कारण मधल्या फळीला प्रोत्साहनाची गरज आहे आणि धोनी भविष्यात पुन्हा सहाव्या क्रमांकावर येऊ शकतो. (गेमप्लान)