शहरं
Join us  
Trending Stories
1
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
2
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
3
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
4
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
5
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
6
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
7
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
8
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
9
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
10
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
11
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
12
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
13
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
14
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
15
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
16
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
17
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
18
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
19
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
20
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार

विजयाचे खाते उघडण्यास टीम इंडिया उत्सुक

By admin | Updated: January 20, 2015 00:20 IST

वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

ब्रिस्बेन : आॅस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे निराश झालेला भारतीय संघ केलेल्या चुकांपासून बोध घेऊन वन-डे सामन्यांच्या तिरंगी मालिकेत मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयी मार्गावर परतण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.उभय संघांना सलामीला यजमान संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उभय संघ मंगळवारच्या लढतीत विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहेत. आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी सिडनीमध्ये इंग्लंडचा ३ गडी राखून पराभव केल्यानंतर रविवारी मेलबोर्नमध्ये भारताविरुद्ध ४ गडी राखून सरशी साधली. पहिल्या लढतीत बोनस गुणांसह विजय मिळविणाऱ्या आॅस्ट्रेलियाने २ लढतींत ९ गुणांची कमाई केली आहे. भारताला सलामी लढतीत थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. भारतातर्फे भुवनेश्वर कुमार व अक्षर पटेल यांनी चांगली गोलंदाजी करून आॅस्ट्रेलियाच्या धावगतीवर अंकुश राखला. कसोटी मालिकेत दुय्यम दर्जाची गोलंदाजी असल्याची टीका झाल्यानंतर भारतीय संघासाठी ही सकारात्मक बाब आहे. भुवनेश्वरला फिटनेसच्या कारणास्तव पहिल्या ३ कसोटी सामन्यांत खेळता आले नव्हते. चौथ्या कसोटी सामन्यात त्याला सूर गवसला नाही. ५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आणि नेटमध्ये कसून सराव केल्यानंतर रविवारी भुवनेश्वरने चांगला मारा केला. आॅस्ट्रेलियात प्रथमच खेळत असलेला फिरकीपटू अक्षर पटेलनेही छाप सोडली. कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्याच्यावर विश्वास व्यक्त करताना अखेरच्या षटकांमध्ये त्याच्याकडे चेंडू सोपविला.त्यानंतर धोनीने डेथ ओव्हर्समध्ये पटेलला प्रथम पसंती मिळण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते; पण त्यासाठी त्याला सातत्याने चांगला मारा करावा लागेल. मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत सर्वांची नजर भुवनेश्वर व पटेल यांच्यावर राहील. या दोन्ही गोलंदाजांकडून पुन्हा एकदा अचूक गोलंदाजीची अपेक्षा आहे. धोनीला गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची आशा आहे. शर्माचा फॉर्म कायम राहिला, तर भारताची सलामीच्या जोडीबाबतची समस्या काहीअंशी सुटेल. दुसऱ्या टोकाकडून शिखर धवनला अद्याप सूर गवसलेला नाही. मधल्या फळीवरील दडपण कमी करण्यासाठी अजिंक्य रहाणे व विराट कोहली यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवर फलंदाजी करताना धावा कराव्या लागतील. रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत अखेरच्या षटकांमध्ये वेगाने धावा फटकावण्याचे दडपण कर्णधार धोनीवर असेल. गेल्या काही वर्षांत वन-डे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. २०११च्या दौऱ्यात भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता; पण त्यानंतर १५ पैकी १२ सामन्यांत भारताने विजय मिळविला. त्यांपैकी ४ सामने इंग्लंडमध्ये खेळले गेले आहेत. दुसऱ्या बाजूचा विचार करताना अ‍ॅलिस्टर कुकच्या स्थानी नवा कर्णधार इयोन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाकडे नवी व्यूहरचना आखण्याचा व अमलात आणण्यासाठी वेळ उरलेला नाही. सराव सत्रामध्ये इंग्लंडने माजी स्टार अष्टपैलू अ‍ॅण्ड्य्रू फ्लिन्टॉफची मदत घेतली. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला असेल. फ्लिन्टॉफ येथे बिग बॅश लीगमध्ये खेळत आहे. केव्हिन पीटरसनही या स्पर्धेसाठी येथे आहे; पण मदतीसाठी त्याला पाचारण करण्यात आलेले नाही.(वृत्तसंस्था)वन डेत धावा काढत असल्याचे समाधान : रैनाविश्वचषकाआधी वन डे क्रिकेटमध्ये धावा काढत असल्याचे समाधान वाटते, असे टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना याचे मत आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचे दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले नसते, तर मालिकेतील अपयशामुळे निराशा झाली असते, असेही तो म्हणाला.रैनाने तिरंगी मालिकेच्या पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतकी खेळी केली.प्रतिस्पर्धी संघ भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहंमद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा.इंग्लंड :- इयोन मोर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रुट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.