शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

टीम इंडिया बॅकफुटवर

By admin | Updated: December 20, 2014 02:26 IST

स्टिव्हन स्मिथचे सलग दुसरे शतक आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध

ब्रिस्बेन : स्टिव्हन स्मिथचे सलग दुसरे शतक आणि तळाच्या फलंदाजांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ९७ धावांची आघाडी घेतली. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात शतक झळकाविणारा स्मिथ नववा खेळाडू ठरला आहे. ६ बाद २४७ अशी अवस्था असताना यजमान संघाने पहिल्या डावात ५०५ धावांची मजल मारली. स्मिथने १३३, तर जॉन्सनने ९३ चेंडूंमध्ये ८८ धावा फटकाविल्या. मिशेल स्टार्कने ५२ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पाहुणा भारतीय संघ २६ धावांनी पिछाडीवर होता. त्यावेळी शिखर धवन (२६) आणि चेतेश्वर पुजारा (१५) खेळपट्टीवर होते. पहिल्या डावात ९७ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने आज, शुक्रवारी तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ७१ धावांची मजल मारली. भारतासाठी या लढतीचा तिसरा दिवस निराशाजनक ठरला. आॅस्ट्रेलियाच्या तळाच्या चार फलंदाजांनी २५८ धावांची भर घातली. कालच्या ४ बाद २२१ धावासंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलियाने ११ धावांची भर घातली असता मिशेल मार्श (११) माघारी परतला. त्याला ईशांत शर्माने तंबूचा मार्ग दाखविला. दुसऱ्या टोकाकडून मात्र स्मिथने संयमी फलंदाजी केली. ब्रॅड हॅडिन (६) ला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. अ‍ॅरोनच्या उसळत्या चेंडूवर त्याचा उडालेला झेल चेतेश्वर पुजाराने टिपला. त्यानंतर स्मिथने जॉन्सनच्या साथीने डाव सावरला. जॉन्सनने ईशांत व अ‍ॅरोनच्या गोलंदाजीवर १९ चेंडूंमध्ये ३७ धावा वसूल केल्या. याव्यतिरिक्त यादवच्या गोलंदाजीवर १८ चेंडूंमध्ये १८ धावा फटकाविल्या. स्मिथने १९१ चेंडूंना सामोरे जाताना १३ चौकार व २ षटकारांच्या सहायाने १३३ धावा फटकाविल्या. स्मिथचे या मालिकेतील हे दुसरे शतक आहे. अ‍ॅडिलेड कसोटी सामन्यात त्याने नाबाद १६२ धावांची खेळी केली होती. स्मिथने चौथ्या विकेटसाठी शॉन मार्शसोबत ८७ धावांची, तर सातव्या विकेटसाठी जॉन्सनसोबत १४८ धावांची भागीदारी केली. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जॉन्सनने ९३ चेंडूंमध्ये १३ चौकार व १ षटकारांसह ८८ धावा फटकाविल्या. नवव्या क्रमांकावरील स्टार्कनेही अर्धशतकी खेळी केली. स्टार्कने ५९ चेंडूंमध्ये ६ चौकार ठोकले. नॅथन लियोन (२३) व स्टार्क यांनी नवव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. स्टार्कचे हे कसोटी क्रिकेटमधील चौथे अर्धशतक ठरले. या व्यतिरिक्त भारताच्या डावात ५ बळी घेणाऱ्या जोश हेजलवूडने नाबाद ३२ धावांचे योगदान दिले. भारतातर्फे ईशांत शर्मा व उमेश यादव यांनी प्रत्येक ३ बळी घेतले. धवन व विजय यांनी भारताला दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या विजयला (२७) स्टार्कने माघारी परतवत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर धवन व पुजारा यांनी संयमी खेळ केला. (वृत्तसंस्था)जॉन्सनचे वादळ रोखण्यास भारतीय गोलंदाज अपयशी : स्टिव्ह स्मिथ> कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना पहिल्या सामन्यात शतक झळकाविणाऱ्या स्टिव्हन स्मिथने या शतकी खेळीपेक्षा मिशेल जॉन्सनच्या ८८ धावांच्या खेळीला अधिक महत्त्व दिले. जॉन्सनला रोखण्यात भारतीय गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. जॉन्सनच्या आक्रमक खेळीला भारतीय गोलंदाजांकडे उत्तर नव्हते, अशी प्रतिक्रिया स्टिव्हन स्मिथने व्यक्त केली. > तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना स्मिथ म्हणाला,‘जॉन्सनने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारला. जॉन्सन नेहमी याच शैलीत खेळतो. भारतीय गोलंदाजांनी त्याच्याविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबविण्याचा प्रयत्न केला आणि आखूड टप्प्यांचा मारा केला. नेमकी हिच बाब जॉन्सनच्या पथ्यावर पडली.’ > स्मिथ म्हणाला,‘जॉन्सनने ‘जशास तशे’ धोरण अवलंबिले. जॉन्सनच्या फटक्यांचे भारतीय गोलंदाजांकडे उत्तर नव्हते. त्याने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मोठी भागीदारी करण्यास आम्ही प्रयत्नशील होतो आणि आम्ही त्यात यशस्वी ठरलो. तळाच्या फलंदाजांनी उल्लेखनीय योगदान दिल्यामुळे आम्हाला वर्चस्व मिळविता आले.’> शतकी खेळीबाबत बोलताना स्मिथ म्हणाला, ‘शतकी खेळी केल्यामुळे निश्चितच आनंद झाला.’ कर्णधार म्हणून पहिल्या कसोटीत शतक झळकाविणारा स्मिथ नववा खेळाडू ठरला आहे. १९७८मध्ये ग्रॅहम येलपने शतक केल्यानंतर अशी कामगिरी करणारा स्मिथ आॅस्ट्रेलियाचा पहिला खेळाडू ठरला आहे.