शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
4
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
5
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
6
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
7
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
9
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
10
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
11
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
12
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
13
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
14
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा
15
Shani Pradosh 2025: शनि प्रदोष आणि शनि जयंतीच्या मुहूर्तावर सलग १३ दिवस करा 'हा' प्रभावी उपाय!
16
हद्द झाली! भलत्याच देशाची छायाचित्रे, व्हिडीओ दाखवून ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींना भिडले; तरी रामाफोसा म्हणत होते...
17
Shani Pradosh 2025: वैवाहिक जीवन सुखी व्हावे म्हणून 'असे' करा शनि प्रदोष व्रत; बघा व्रताचरण!
18
"आई मी चिप्सची पाकीटं चोरली नाही"; दुकानदाराचं बोलणं जिव्हारी लागलं, चिठ्ठी लिहून मुलानं आयुष्य संपवलं!
19
"मला सलमाननेच बोलावलं होतं!"; गॅलेक्सीमध्ये घुसखोरी करणाऱ्या ३२ वर्षीय मॉडेलचा मोठा दावा, म्हणाली-
20
"शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करण्याची पद्धत बंद करा आणि...", संभाजी भिडे यांचं विधान

लक्ष्य मालिका विजयाचे

By admin | Updated: June 13, 2016 06:09 IST

युवा भारतीय संघ यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहे.

हरारे : सलामी लढतीत शानदार विजय मिळवणारा धोनी ब्रिगेडच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ यजमान झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीप करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास उत्सुक आहे. उभय संघांदरम्यान आज, सोमवारी दुसरी लढत होणार आहे. भारताने सलामी लढतीत झिम्बाब्वेविरुद्ध प्रत्येक विभागात सरस कामगिरी केली. कामगिरीत सातत्य राखण्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा निर्धार आहे. युवा जसप्रीत बुमराहने चार बळी घेत झिम्बाब्वेचा डाव १६८ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तर सलामीवीर लोकेश राहुलने पदार्पणाच्या लढतीत नाबाद शतकी खेळी केली. आॅगस्ट महिन्यात कसोटी मालिकेसाठी विंडीजला जाणाऱ्या संघात समावेश असलेला राहुल या मालिकेत मोठी खेळी करीत आपले मनोधैर्य उंचावण्यास उत्सुक आहे. अंबाती रायडूने राहुलला योग्य साथ देताना १२० चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ६२ धावा फटकावल्या. (वृत्तसंस्था)>अम्बाती रायडूने गाठला हजार धावांचा पल्लायुवा भारतीय फलंदाज अंबाती रायडूने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील सलामी लढतीत आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये वैयक्तिक एक हजार धावांचा पल्ला गाठला. झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ६२ धावांची खेळी करताना रायडूने हा पराक्रम केला. डावातील ४८ वी धाव घेतल्यानंतर रायडूने कारकिर्दीत एक हजार धावा पूर्ण केल्या. त्याने ३२ सामन्यांत २९ डावांत ही कामगिरी केली. त्याच्या खात्यावर आता १०१४ धावांची नोंद आहे. सर्वांत वेगवान एक हजार धावांचा पल्ला गाठण्याच्या शर्यतीत रायडू भारतीय फलंदाजांमध्ये संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहे. रायडूने लोकेश राहुलच्या (नाबाद १००) साथीने झिम्बाब्वेविरुद्ध पहिल्या वन-डे लढतीत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. >मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता : लोकेशझिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतील पहिली लढत आणि आपल्या पदार्पणाच्या वन-डे लढतीत शतकी खेळी करणारा भारतीय फलंदाज लोकेश राहुल कामगिरीमुळे खूश आहे. मला माझ्या क्षमतेवर विश्वास होता, अशी प्रतिक्रिया शतकवीर राहुलने व्यक्त केली. लढतीनंतर बोलताना राहुल म्हणाला, ‘ही निश्चितच चांगली कामगिरी होती. शतकी खेळीमुळे माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली. मी त्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. झिम्बाब्बेविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी करण्याची संधी होती आणि त्या संधीचा लाभ घेण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्याच्या निर्धाराने सहभागी झालो आहे.