शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

टार्गेट नेट रनरेटचे

By admin | Updated: March 23, 2016 03:14 IST

पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताला बुधवारी आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल

बंगळुरू : पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारताला बुधवारी आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत बांगलादेशाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. या सामन्यात भारत सरस दिसत असला तरी मोठा विजय मिळवून नेट रनरेटमध्ये पुढे जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताने त्यानंतर ईडन गार्डनवर पाकिस्तानविरुद्ध सरशी साधून पुनरागमन केले. बांगलादेशाविरुद्ध विजय मिळविण्यात यश आले, तर भारत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्यामुळे ‘नेट रनरेट’वर परिणाम झाला आहे. यात सुधारणा करण्यासाठी भारतीय संघापुढे बांगलादेशाविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळविण्याचे लक्ष्य आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता, बांगलादेश संघ स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारताविरुद्ध त्यांना विजय मिळविण्यात यश आले, तरी अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्यासाठी ‘नेट रनरेट’च्या गणितावर अवलंबून राहावे लागेल. भारताची फलंदाजीची मजबूत आहे. विराट कोहलीला रोखणे बागंलादेशाच्या गोलंदाजांसाठी आव्हान ठरेल. शिखर धवन, सुरेश रैना व रोहित शर्मा यांचा फॉर्म भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. कोहलीच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल. सहज धावा वसूल करण्याच्या बाबतीत हा शैलीदार फलंदाज अन्य फलंदाजांच्या तुलनेत सर्वांत आघाडीवर आहे. रोहित, धवन व रैना हे सातत्याने अपयशी ठरत असल्यामुळे संघव्यवस्थापन अजिंक्य रहाणेला संधी देण्याबाबत विचार करू शकते. रहाणेला या स्पर्धेत अद्याप संधी मिळालेली नाही. युवराजने पाकविरुद्धच्या लढतीत २४ धावांचे उपयुक्त योगदान देताना कोहलीसोबत ६१ धावांची भागीदारी केली होती. तो कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. गोलंदाजी आक्रमण दर्जेदार भासत आहे; पण कर्णधार महेंद्रसिंग धोनी सिनिअर आॅफ स्पिनर्स हरभजन सिंगबाबत काय निर्णय घेतो, याबाबत उत्सुकता आहे. या स्पर्धेत खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असल्याचे चित्र आहे. > प्रतिस्पर्धी संघ : भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आर. आश्विन, जसप्रीत बुमराह, शिखर धवन, हरभजनसिंग, रवींद्र जडेजा, विराट कोहली, मोहंमद शमी, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रोहित शर्मा व युवराजसिंग. बांगलादेश : मशरफी मुर्तझा (कर्णधार), शाकीबुल हसन, अबू हैदर, अल अमीन हुसेन, महमदुल्ला, मोहंमद मिथुन, मुस्तफिजुर रहमान, नासीर हुसेन, नुरुल हसन, शब्बीर रहमान, सौम्या सरकार व तमीम इक्बाल.