शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

तानिशा : गोव्याची ‘रायझिंग सिंधू’; आता लक्ष विश्व स्पर्धेच्या निवडीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 19:26 IST

तानिशाने रशियातील विश्व ज्युनियर स्पर्धेसाठीच्या निवडीवर दावा मजबूत केला आहे. तिच्या यशाचा आलेख पाहता तिला गोव्याची ‘रायझिंग सिंधू’ म्हणून संबोधले जात आहे.

सचिन कोरडे, पणजी : भारतीय बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकून इतिहास रचला. तर दुसरीकडे, गोव्याच्या तानिशा क्रास्तो हिने भारतीय बॅडमिंटनच्या ज्युनिअर गटात सुवर्णपदकांची लयलूट करीत रविवारचा दिवस गाजवला. हा दिवस बॅडमिंटनसाठी खास ठरला. तानिशाचे सलग सुवर्णपदक भारतीय बॅडमिंटन निवडकर्त्यांचे लक्ष वेधणारे ठरले. त्यामुळे दोन्ही अखिल भारतीय मानांकन स्पर्धा जिंकून तानिशाने रशियातील विश्व ज्युनियर स्पर्धेसाठीच्या निवडीवर दावा मजबूत केला आहे. तिच्या यशाचा आलेख पाहता तिला गोव्याची ‘रायझिंग सिंधू’ म्हणून संबोधले जात आहे.

रशिया येथे होणाºया विश्व ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेसाठी पंचकुला आणि बंगळुरू येथील अखिल भारतीय मानांकन स्पर्धा म्हणजे निवड चाचणीच होती. त्यामुळे या दोन्ही स्पर्धांतील कामगिरीवर निवडकर्त्यांचे खास लक्ष होते. पंचकुला येथील स्पर्धेत तानिशाने दुहेरी मुकूट पटकाविला होता. आता बंगळुरू येथील स्पर्धाही गाजवत तिने जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघातील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. बंगळुरू येथील स्पर्धेत तानिशाने मुलींच्या दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात सुवर्णमय कामगिरी केली. तानिशा आणि आदिती भट्ट या जोडीने अव्वल मानांकित त्रिशा ज्योली आणि वर्षिणी व्ही. एस. या जोडीचा २१-१५, २१-२३, २१-१७ ने पराभव केला.  सामन्यात शेवटच्या ५७ व्या मिनिटाला त्यांनी बाजी मारली. मिश्र दुहेरी गटात, तानिशाने ईशान भटनागर याच्यासोबत खेळताना शानदार प्रदर्शन केले. त्यांनी नवनीथ बोक्का आणि साहिथी बंदी या जोडीचा अवघ्या २८ मिनिटांत फडशा पाडला. त्यांनी हा सामना २१-१४, २१-१५ ने जिंकला. 

टॅग्स :BadmintonBadmintonPV Sindhuपी. व्ही. सिंधूgoaगोवा