नवी दिल्ली : भारतीय महिला बॉक्सर सरिता देवी प्रकरणात आयबाने (आंतराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघ) सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहन बॉक्सिंग इंडियाने केले आहे. त्याचप्रमाणो बॉक्सिंग इंडियाने सरिताचे पती थोएबा सिंग व वैयक्तिक प्रशिक्षक लेनिन मेपी यांना कारणो दाखवा नोटीस बजावली असून, 3क् दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे.
इंचियोन आशियाई स्पर्धेत सरिताने पोडियमवर पदक स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयबातर्फे सरितावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घटनेनंतर बॉक्सिंग इंडियाचे अध्यक्ष संदीप जाजोदिया यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांपुढे बॉक्सिंग इंडियाची भूमिका माडंली.
जाजोदिया म्हणाले, की केवळ बॉक्सिंग इंडियाच नाही तर क्रीडा मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आयबाला पत्र लिहिताना सरिता प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले. या संयुक्त प्रयत्नांमुळे आयबावर दडपण येईल आणि सरितावरील निलंबनाची कारवाई रद्द होईल, असा आम्हाला विश्वास आहे.