शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

टी-२0 वर्ल्डकप रद्द?

By admin | Updated: June 19, 2017 01:05 IST

२0१८ मध्ये अधिकांश देश द्विपक्षी मालिकेत व्यस्त असल्यामुळे सातवी वर्ल्डकप टी-२0 स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि या स्पर्धेचे आयोजन २0२0 मध्ये होऊ शकते.

लंडन : २0१८ मध्ये अधिकांश देश द्विपक्षी मालिकेत व्यस्त असल्यामुळे सातवी वर्ल्डकप टी-२0 स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे आणि या स्पर्धेचे आयोजन २0२0 मध्ये होऊ शकते.आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) सूत्रांनुसार आयसीसी वर्ल्डकप टी-२0 स्पर्धेचे पुढील आयोजन २0२0 मध्ये होईल; परंतु त्यासाठी स्थळ अद्याप निश्चित झालेले नाही. सूत्राने म्हटले, ‘२0१८ मध्ये वर्ल्डकप टी-२0 स्पर्धा आयोजित होणार नाही. कोणत्याही स्थळाचा निर्णय घेण्यात आला नाही. मुख्य कारण म्हणजे सदस्य देशांदरम्यान जास्त द्विपक्षीय मालिका होणार आहेत. २0१८ मध्ये स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता नाही; परंतु २0२0 मध्ये ही स्पर्धा होईल. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका अथवा आॅस्ट्रेलियात होऊ शकते. द्विपक्षीय मालिकेशिवाय अन्यदेखील कारण आहे. आयसीसी स्पर्धा खूप होत असल्यामुळे सदस्य देशांच्या मते त्यांनादेखील पुरेशा वेळेची आवश्यकता आहे.’वर्ल्डकप टी-२0 चे आयोजन न होणे आयसीसीसाठी मोठा धक्का आहे का, असे विचारले असता, तो म्हणाला, ‘निश्चितच नाही. पर्याप्त टी-२0 लीग आहेत आणि चाहत्यांसाठी खूप क्रिकेट आहे.’ भारतीय संघ पुढील वर्षी अधिकांश वेळेत दौऱ्यावर असेल आणि ज्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेपासून होईल. त्यानंतर टीम इंडिया इंग्लंड आणि आॅस्ट्रेलिया दौऱ्यावरही जाणार आहे. सध्या २0१२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची पुढील स्पर्धा भारतात आयोजित करण्याचे वेळापत्रक आहे. उद्यापासून येथे सुरू होणाऱ्या आयसीसी वार्षिक संमेलनात विश्व टेस्ट चॅम्पियनशिपवर चर्चा होऊ शकते. आयसीसी प्रदीर्घ वेळेपासून सर्वच स्वरूपातील कमीत एक जागतिक स्पर्धा सुरू करण्याची योजना बनवत आहे. प्राप्त माहितीनुसार बीसीसीआय आता प्रस्तावित आपले ३९ कोटी डॉलरच्या हिश्श्यातील फायद्याचा आग्रह करू शकतो; परंतु सदस्य देश त्याला अयोग्य मानतात. त्यामुळे ही मागणी पूर्ण होण्याची शक्यता नाही. आतापर्यंत दक्षिण आफ्रिका (२00७), इंग्लंड (२00९), वेस्ट इंडीज (२0१0), श्रीलंका (२0१२), बांगलादेश (२0१४) आणि भारत (२0१६) यांनी वर्ल्डकप टी-२0 चे आयोजन केले आहे. द्विपक्षीय मालिकेने सर्वच देशांची कमाई होते त्याचा मोठा भाग हा प्रसारण करारापासून येतो. विशेषत: भारताने एखाद्या देशाचा दौरा केल्यास यजमान बोर्डाला टीव्ही प्रक्षेपण हक्कातून लाखो डॉलरची कमाई होत असते.