शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

स्विस इनडोअर टेनिस : फेडररचा विक्रमी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 01:23 IST

एकाच स्पर्धेत सर्वाधिक १५व्यांदा अंतिम फेरी गाठण्याचा विश्वविक्रम

बासेल : स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याने घरच्या मैदानावर खेळताना ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपास याचा पराभव करत स्विस इनडोअर टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे फेडररने या स्पर्धेत १५व्यांदा अंतिम फेरी गाठली असून कोणत्याही स्पर्धेत सर्वाधिक १५वेळा अंतिम फेरी गाठणारा फेडरर जगातील एकमेव व्यावसायिक टेनिसपटू ठरला.जागतिक क्रमवारीतील तिसरा आणि स्पर्धेतील अव्वल मानांकित फेडररने एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात सित्सिपासचा ६-४, ६-४ असा फडशा पाडला. दखल घेण्याची बाब म्हणजे यंदाच्या वर्षातील फेडररचा हा ५०वा विजयही ठरला. आता फेडरर आपल्या घरच्या स्पर्धेत दहाव्यांदा जेतेपद पटकावण्यासाठी आॅस्टेÑलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनाउरविरुद्ध भिडेल. फेडरर कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच अ‍ॅलेक्सविरुद्ध खेळेल.अ‍ॅलेक्सने अंतिम फेरी गाठताना अमेरिकेच्या एली ओपेल्का याचा ७-६(२), ६-७(४), ७-६(३) असा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या लढतीत झुंजार खेळ करताना अ‍ॅलेक्सने मोक्याच्या वेळी खेळ उंचावला.या स्पर्धेत फेडररने २०१३ साली जुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्ध अखेरचा पराभव पत्करला होता. त्यामुळे आता अंतिम सामन्यात ओपेल्कापुढे जेतेपदासाठी तगडे आव्हान आहे.

टॅग्स :BadmintonBadminton