शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

गौरवीचे समुद्रात ३६ किमीचे थक्क करणारे स्विमिंग

By admin | Updated: March 27, 2017 00:59 IST

जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त प्रयत्न करत राहण्याची इच्छाशक्ती हवी. जिद्दीच्या जोरावर कोणतंही

मुंबई : जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, फक्त प्रयत्न करत राहण्याची इच्छाशक्ती हवी. जिद्दीच्या जोरावर कोणतंही यशोशिखर गाठता येते याची प्रचिती उदयपूरच्या १४ वर्षांच्या गौरवी सिंघवीने दिली आहे. लहानपणापासून पोहण्यात तरबेज असलेल्या गौरवीने वरळी सी लिंक ते गेट वे आॅफ इंडिया हे अरबी समुद्रातील ३६ किलोमीटरचं अंतर अवघ्या ६ तास ३५ मिनिटांत पूर्ण केले आहे. त्यामुळे तिच्या नावे नव्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.वयाच्या १४ व्या वर्षी तिने अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करत समुद्रातील ३६ किलोमीटरचं अंतर पार केले आहे. विशेष म्हणजे या मार्गावर ३६ किलोमीटरचं अंतर पार करणारी ती पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेने गौरवीला ३६ किलोमीटर अंतर पार करणारी पहिली महिला जलतरणपटू म्हणून प्रमाणित केलं आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लेकसिटीच्या या गौरवीने ख-या अर्थाने राजस्थानच्या उदयपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. गौरवी हे ध्येय गाठण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून परिश्रम करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने मुंबईतल्या गव्हर्नर हाऊस ते गेट वे आॅफ इंडियापर्यंतचे १६ किलोमीटरचं अंतर ३ तास ५८ मिनिटांत पूर्ण करून स्वत:च्या नावे रेकॉर्ड नोंदवला होता. होळीच्या एक दिवस अगोदरच गौरवीनं फतेहसागरमध्ये २० किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. गौरवी मुंबईतलं १६ किलोमीटरचं अंतर ४ तासांहून कमी वेळात पार करू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. या मार्गावर हा रेकॉर्ड बनवणारी ती सर्वात कमी वयाची जलतरणपटू ठरली होती. यापूर्वी हा रेकॉर्ड उदयपूरच्या भक्ती शर्मा आणि एका पुरुषाच्या नावे होता. भक्तीनं ४ तास १५ मिनिटं, तर एक पुरुष जलतरणपटूनं ४ तास १२ मिनिटांत हे १६ किलोमीटरच अंतर पार केलं होते.राज्य जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली गौरवी देशासाठी जलतरण स्पर्धेत पदक मिळवण्याची इच्छा असल्यानं ती लागोपाठ प्रयत्नशील आहे. तिच्या या यशात तिचे स्विमिंग कोच महेश पालीवाल यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनातच गौरवी सिंघवी हे यशोशिखर गाठू शकली आहे. महेश पालीवाल म्हणाले, गौरवीची पोहण्याची क्षमता चांगली आहे. पहिल्यांदा तिला पोहताना पाहिलं, तेव्हा समजलं होतं की, गौरवी पोहण्यात तरबेज आहे. ती थंडीच्या मोसमातही लागोपाठ ६ ते ८ तासांपर्यंत पोहण्याचा सराव करत होती. (आॅनलाइन लोकमत)