शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

स्वरुप पुराणिक अमेरिकेत ठरले आयर्न मॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 18:36 IST

मुंबई : इच्छा तेथे मार्ग असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे. हे डॉ. स्वरुप पुराणिक यांच्या बाबतीत अगदी ...

मुंबई: इच्छा तेथे मार्ग असे म्हटले जाते आणि ते खरंच आहे. हे डॉ. स्वरुप पुराणिक यांच्या बाबतीत अगदी खरे ठरले आहे. तुमच्यातील ताकदीची परीक्षा घेणारी क्रीडा क्षेत्रातील बहुधा सगळ्यात कठीण चाचणी म्हणजेच आयर्न मॅन ट्रायथलॉन पूर्ण करण्याच्या त्यांच्या अद्वितीय महत्त्वाकांक्षेपासून त्यांना कोणीही रोखू शकलेले नाही.

डॉ. स्वरुप (पेरीओडोंटिस्ट आणि आयआयएम पदवीधर) दुहेरी जबाबदारी सांभाळतात. यंदाच्या उन्हाळ्यात 27 एप्रिल रोजी त्यांनी टेक्सास येथे त्यांची दुसरी आयर्न मॅन उत्तर अमेरिकन चॅम्पियनशीप पूर्ण केली. यापूर्वी डॉ. स्वरूप यांनी दुबई येथे फेब्रुवारी 1, 2019 रोजी आयरन मॅन 70.3 चॅम्पियनशिप पूर्ण केली होती. आयर्न मॅन ट्रायथलॉन हा ट्रायथलॉनमधील अत्यंत अवघड प्रकार आहे. यात 4000 मी. खुल्या पाण्यात पोहणे 180 किमी सायकलिंग 42 किमी रन असते. हे सगळे न थांबता याच क्रमाने करायचे असते. ही स्पर्धा पूर्ण करण्यास 16 तासांचा वेळ दिला जातो. जगभरातील हा एक सर्वात कठीण आणि दमवणारा एक दिवसीय क्रीडाप्रकार मानला जातो.

डॉ स्वरूप किती वेळात गेम  पूर्ण केला ते खालीलप्रमाणे: जलतरण (1:27:36), सायकलिंग (7:09:29) आणि धावणे (07:35:43) परिणामी, डॉ. स्वरुपने ही त्रैथलॉन रेस 16 तास 31 मिनिटे आणि 12 सेकंदात पूर्ण केली.डॉ. स्वरुप यांच्या या यशाचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कोचिंग यासाठी घेतलेले नाही. काम, प्रशिक्षण, व्यायाम... इतकी विविध कामे त्यांच्या हातात असतात हे पाहता अर्थातच ही कामगिरी सोपी नव्हती. डॉ. स्वरुप यांच्यासाठी ताकद हा काही नवा विषय नाही. आजवरच्या आयुष्यात ते नेहमीच कसलेले अॅथलेट आणि खेळाडू राहिले आहेत. अगदी लहानपणापासून ते पोहणे आणि इतर क्रीडाप्रकार खेळताहेत. त्यामुळे, या स्पर्धेसाठी त्यांनी तयारी केली यात काहीच आश्चर्य नाही. खेळातील त्यांचे यश लक्षणीय आहे. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अंडर १७ आणि अंडर १९ तसेच युनिर्व्हसिटी स्पर्धांमध्ये पोहण्यातील त्यांनी अनेक पदके मिळवली आहेत. ते जिल्हास्तरीय आणि विभागीय स्तरावरील टेबल टेनिलपटू होते. ते जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटनपटू आणि राज्यस्तरीय कबड्डीपटू होते. ते नॅशनल क्लास बी बुद्धिबळपटू आणि टेनिसपटूही होते.

टॅग्स :MumbaiमुंबईAmericaअमेरिका