शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित

By admin | Updated: October 25, 2016 19:53 IST

सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक धक्का बसला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 25 -  सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या रोषाला सामोरे जात असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणखी एक धक्का बसला आहे. बीसीसीआयला इंडियन प्रीमिअर लीगची (आयपीएल) मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया स्थगित करावी लागली. आयपीएल मीडिया अधिकार निविदा प्रक्रिया मंगळवारी संपन्न होणार होती, पण बीसीसीआयने सोमवारी रात्री उशिरा ही प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. निविदा उघडण्याची पुढील तारीख कुठली असेल, याबाबत मात्र बोर्डाने स्पष्ट केले नाही. बीसीसीआयने स्पष्ट केले की,‘सर्वोच्च न्यायालयाने २१ आॅक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार लोढा समितीला आयपीएल निविदा प्रकियेचे संरक्षक म्हणून नियुक्त केले आहे. बोर्डाची या प्रक्रियेसाठी पूर्णपणे तयारी होती, पण कुठलेही पाऊल उचलण्यापूर्वी समितीच्या निर्देशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लोढा समितीने या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी अद्याप स्वतंत्र लेखा परीक्षकाची नियुक्ती केलेली नाही.’ यासाठी लोढा समितीसोबत सातत्याने संपर्क साधण्यात आला आणि मीडिया अधिकार निविदा प्रक्रियेला उशीर झाला तर व्यावसायिक हित प्रभावित होत असल्याचे निदर्शनास आणून दिले, असे बीसीसीआयने स्पष्ट केले. बोर्डाने त्याचसोबत निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या देश-विदेशातील सदस्यांची क्षमा मागितली आणि त्यांना संयम बाळगण्याची विनंती केली. निविदा प्रक्रियेमध्ये १८ जणांनी निविदा सादर केल्या असल्याचे वृत्त आहे.(वृत्तसंस्था)