शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

डीडीसीए निलंबित करा

By admin | Updated: November 18, 2015 04:00 IST

भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीप्रकरणी सकृतदर्शनी पुरावे आढळल्याच्या कारणांवरून दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) बीसीसीआयने निलंबित करावे अशी

नवी दिल्ली : भ्रष्टाचार आणि आर्थिक अफरातफरीप्रकरणी सकृतदर्शनी पुरावे आढळल्याच्या कारणांवरून दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेला (डीडीसीए) बीसीसीआयने निलंबित करावे अशी शिफारस दिल्ली सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात केली आहे. अंतरिम कारभार पाहण्यासाठी व्यावसायिक क्रिकेटपटूंची समिती नियुक्त करावी, असे अहवालात पुढे सुचविले आहे.३ डिसेंबरपासून फिरोजशाह कोटलावर भारत-द. आफ्रिका चौथ्या कसोटी सामन्याचे आयोजन डीडीसीएला करायचे आहे. सामना आयोजित करू शकणार किंवा नाही याबाबत बीसीसीआयला कळविण्याचा आज मंगळवार अखेरचा दिवस होता. नेमके त्याचवेळी समितीने निलंबनाची शिफारस केल्याने अडचणीत भर पडली आहे. सामन्यासाठी परवानगी मिळविण्यात अपयश आल्यास हा सामना पुण्यात हलविण्याचा पर्याय बीसीसीआयने ठेवला आहे. डीडीसीएचा कारभार चालविण्यासाठी व्यावसायिक खेळाडूंची अंतिरिम समिती स्थापन करावी शिवाय तपास करण्यासाठी चौकशी आयोग स्थापन करावा, या दोन महत्त्वपूर्ण शिफारसी प्रधान सचिव चेतन सांघी यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांच्या समितीने केल्या. चौकशी समितीची स्थापना गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. डीडीसीएला माहितीच्या अधिकार कक्षेत आणावे असेही या समितीने म्हटले आहे. या चौकशीचा चौथ्या कसोटीशी काही संबंध नसल्याचे समितीने स्पष्ट केले. सट्टेबाजीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या न्या. लोढा समितीला आमचा अहवाल सोपवावा, असेही समितीने सुचविले आहे. लोढा समिती सध्या बीसीसीआयचे कार्य सुधारण्यासाठी नियमावली तयार करण्यात व्यस्त आहे. अबकारी विभागानुसार डीडीसीएने २०१२ पासून २४ कोटींचा मनोरंजन कर भरलेला नाही. या करात सूट मिळण्याची संघटनेला आशा आहे. दुसरीकडे कसोटीच्या आयोजनासाठी अबकारी विभागाची मंजुरीदेखील आवश्यक आहे. थकबाकी वसुलीसाठी अबकारी आयुक्त कार्यालय न्यायालयात धाव घेऊ शकते. क्रीडा हा विषय राज्य सरकारच्या कक्षेत येत असल्याने राजधानीत खेळांचे प्रभावी संचालन करण्यासाठी कायदा बनविण्याचा सरकारचा विचार आहे. गेल्या तीन दिवसांतअनेक नाट्यमय घाडामोडी घडल्या. रविवारी डीडीसीए उपाध्यक्ष चेतन चौहान आणि कोषाध्यक्ष रविंदर मनचंदा यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. (वृत्तसंस्था)