शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

अपराधी वृत्तीमुळे पुन्हा हादरले क्रीडाविश्व; सुशील प्रकरणाला भावनिक नात्याचे बंध नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:47 IST

दोन दशके त्याने कुस्तीमध्ये वर्चस्व गाजवले आणि त्याची ही प्रतिमा महिनाभरापेक्षा कमी कालावधीत मलिन झाली. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले तर त्याची आणखी बदनामी होईल.

- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर 

गेल्या आठवड्यात मल्ल सुशील कुमारला हत्येच्या आरोपात झालेली अटक कुठल्याही क्रीडा इतिहासातील नाट्यमय घडामोड ठरली. पोलिसांपासून जवळजवळ तीन आठवडे पळ काढणाऱ्या सुशीलला अखेर राजधानी दिल्लीत अटक करण्यात आली. हातात बेड्या असलेले त्याचे छायाचित्र त्याच्या प्रतिमेला धक्का पोहचविणारे ठरले.मितभाषी सुशील दोनदा ऑलिम्पिक पदकांचा (बीजिंग २००८मध्ये कांस्य आणि लंडन२०१२मध्ये रौप्य) मानकरी होता. सुशीलची जगात ख्याती होती. तो भारतातील युवा मल्लांचा प्रेरणास्रोत होता. दोन दशके त्याने कुस्तीमध्ये वर्चस्व गाजवले आणि त्याची ही प्रतिमा महिनाभरापेक्षा कमी कालावधीत मलिन झाली. त्याच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाले तर त्याची आणखी बदनामी होईल.उत्तर भारतातील कुस्तीचे प्रमुख केंद्र असलेल्या छत्रसाल आखाड्यातील ज्युनियर मल्ल २३ वर्षीय सागरच्या हत्येचा त्याच्यावर आरोप आहे. सुशील कुमारच्या कल्पनेतूनच हे कुस्ती संकुल साकारण्यात आले होते. त्याने त्याचा वैयक्तिक लाभासाठी वापर केला.चुकीचे पाऊल पडलेला सुशील काही पहिला दिगगज क्रीडापटू नाही. १९९४ मध्ये अमेरिकन फुटबॉल दिग्गज ओ.जे. सिम्पसनवर पत्नी निकोल ब्राऊन सिम्पसनची हत्या केल्याचा आरोप होता. नाट्यमय पाठलाग करून त्याला अटक करण्यात आली होती. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत प्रदीर्घ व वादग्रस्त ठरलेली ही घटना होती. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पॅरालिम्पिक चॅम्पियन ब्लेड रनर ऑस्कर प्रिस्टोरियसला त्याची मैत्रीण रीवा स्टीनकॅम्पच्या हत्येप्रकरणी तुरुंगात डांबण्यात आले होते. या प्रकरणात प्रिस्टोरियस अद्याप तुरुंगातच आहे.व्यासपीठावर तिरंगा फडकलेला बघण्याच्या भावनेशी कसलीच तुलना करता येणार नाही, असे सुशील लंडनमध्ये म्हणाला होता. सुशीलच्या कारकिर्दीवर दृष्टिक्षेप टाकला असता त्यात असंतोष दिसून येतो. त्याचे नरसिंग यादवसोबत बिनसल्याचा इतिहास आहे. बऱ्याच मल्लांनी अन्य आखाड्यांसाठी छत्रसाल सोडल्याची सत्यता, पात्रतेच्या लढती खेळण्यास नकार देणे सुशीलला मान्य नव्हते. तरी सुशीलकडे जीवनात कीर्ती, पैसा, मानसन्मान आदींचा खजिना होता. असा व्यक्ती क्रूरतेच्या कथित कृत्याकडे कसा काय वळतो ? असा प्रश्न पडतो. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला मानवी स्वभावाबाबत विशेष कल्पना नाही, पण सुशील कुमारच्या कथित घटनेने आपल्याला नक्कीच आश्चर्यचकित केले, हे कबूल करावेच लागेल.ज्या व्यक्तीला मी दोनदा भेटलो त्या तुलनेत ही व्यक्ती एकदम वेगळी आहे. २०१२ मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये ६६ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावल्यानंतर तो केवळ भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या अभिमानाबाबत बोलला. सिम्पसन व प्रिस्टोरियस यांच्याप्रमाणे सुशील प्रकरणाला भावनिक नात्याचे बंध नाहीत. परंतु ‘पॉवर सिंड्रोम’ सिद्धांताचा वास येतो. त्यात काही लोकांवर व प्रियजनांसह पूर्ण नियंत्रण ठेवण्याची मानसिक इच्छा असते. अशा व्यक्तीच्या वर्तनामुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसतो.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमार