शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुपर सायना फायनलमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2015 00:01 IST

सुपर सायनाने भारतीयांसाठी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करताना इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या अंतिम फेरीत

जकार्ता : सुपर सायनाने भारतीयांसाठी आणखी एक अभिमानास्पद कामगिरी करताना इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्यांदाच महिलांच्या अंतिम फेरीत धडक मारली. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. विजेतेपदासाठी सायनासमोर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू व गतविजेती स्पेनच्या बलाढ्य कॅरोलीना मारिनचे आव्हान असेल.पहिल्या सेटच्या सातव्या मिनिटालाच फेनात्रीला गुडघा दुखावल्याने उपचार घ्यावे लागले. या वेळी सायना एका गुणाने ६-७ अशी पिछाडीवर होती. मात्र तरीदेखील फेनात्रीने चांगली लढत देताना सायनाला विजयासाठी झुंजवले. परंतु, सायनाने आपल्या अनुभवाच्या जोरावर पहिल्या सेटमध्ये बाजी मारून सामन्यात आघाडी घेऊन फेनात्रीला दबावाखाली आणले.दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलादेखील दोन्ही खेळाडूंनी चुरशीचा खेळ केला. शेवटच्या काही मिनिटांमध्ये सायनाने घेतलेली आघाडी टिकवून ठेवली; तर फेनात्रीनेदेखील कडवी झुंज देताना पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले. परंतु दुखापतीमुळे तिच्या खेळावर व हालचालींवर मर्यादा येत होत्या. मात्र तरीदेखील सायनाच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. फेनात्रीने याआधी कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. तसेच बिगरमानांकित असताना तिने उपांत्य फेरीत धडक मारताना सर्वांनाच चकित केले. विजेतेपदासाठी आता सायनाची लढत रविवारी बलाढ्य कॅरोलीनाविरुद्ध होईल. गतविजेत्या असलेल्या कॅरोलीनाने सर्वांनाच आपल्या खेळाने आकर्षित केले आहे.५५ मिनिटांच्या सामन्यात सायना नेहवालने इंडोनेशियाच्या लिंडावेनी फेनात्रीचा दोन सरळ सेटमध्ये २१-१७, २१-१७ असा पाडाव केला. सुरुवातीला सावध पवित्रा घेतलेल्या सायनाने नंतर फेनात्रीला हिसका दाखवताना बाजी मारली. स्वातंत्र्य दिनी विजयी भेट!एकीकडे भारतीय क्रिकेट संघाने लंकेविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर सायनाने या कामगिरीसह भारतीयांना स्वातंत्र्य दिनी विजयी खेळाची भेट दिली.