शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

सुपर मॉम; बॉक्सर ते आई मेरी कोम निभावते दुहेरी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 03:55 IST

मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत.

नवी दिल्ली : मेरी कोम हिची तुलना सध्या जगप्रसिद्ध बॉक्सर मॅनी पॅकियायो याच्यासोबत होत आहे. पॅकियायो हा फिलिपिन्सचा सिनेटर आहे, तर मेरी कोम सध्या राज्यसभेची सदस्य आहे. या दोघांच्याही आयुष्यात दुहेरी भूमिका आहेत. त्यात दोघेही व्यस्त असले. तरी मेरी कोम आई म्हणूनही सजग आहे. आणि ती पुरेसा वेळ आपल्या मुलांसोबत घालवते.२०१६ मध्ये मेरी कोम हिला राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले. त्यानंतर तिने पाचवे आशियाई पदक जिंकले. तसेच २०१२ च्या आॅलिम्पिकमध्ये तिने कांस्यपदक मिळवले होते. आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली महिला भारतीय खेळाडू आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मॅग्निफिशंट मेरी म्हणून तिला ओळखले जाते. इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनने तिला गौरवले होते.राष्ट्रकुल स्पर्धेतील लढत तिच्यासाठी स्मरणीय राहिली. या लढतीत तिने ४८ किलो गटात आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाराचा पराभव केला होता.मेरी कोम हिचे बॉक्सिंग करियर हे प्रभावी राहिले आहे. ती भारतातील सर्वात यशस्वी महिला खेळाडू ठरली आहे. आता राज्यसभा सदस्य म्हणूनही ती आपली जबाबदारी निभावत आहे.आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावण्यातही सुपर मॉम मेरी आघाडीवर आहे. ३५ व्या वर्षीही निवृत्तीचा विचार तिच्या मनाला शिवलेला नाही.मेरीने २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार, २००६ मध्ये पद्मश्री आणि २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळवला आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळवणारी मेरी ही पहिली हौशी खेळाडू आहे.सुपर मॉम मेरीनवी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी आपल्या मुलांसोबत वेळ घालवणे तिला आवडते. तिन्ही मुलांसोबत तिला फुटबॉल खेळायला आवडते. मेरी कोम तिची मुले कोरोंग रेचुंगवर, कोरोंग खुपनुईवर, कोम आणि सर्वात धाकटा कोरोंग प्रिन्स चुंगथांगलेन यांच्यासोबत पुरेसा वेळ घालवते.

टॅग्स :Mary Komमेरी कोमSportsक्रीडा