शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘केकेआर’ला ‘सुपर’ चॅलेंज

By admin | Updated: April 28, 2015 00:24 IST

गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आलेखामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे.

चेन्नई : गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीच्या आलेखामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघापुढे दोनदा जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स संघाला त्यांच्या गृहमैदानावर पराभूत करण्याचे आव्हान आहे. उभय संघांदरम्यान मंगळवारी लढत होत आहे. कोलकाता संघाने या स्पर्धेत सहापैकी तीन सामन्यांत विजय मिळविला आहे, तर एक सामना रद्द झाला. कोलकाता संघाच्या खात्यावर ७ गुणांची नोंद असून, गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या स्थानी आहे. चेन्नई संघाला केवळ एका लढतीत पराभव स्वीकारावा लागला असून, पाच विजयांसह हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. उभय संघांदरम्यानच्या तुलनेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील संघ समतोल भासत आहे. कोलकाता संघाला कामगिरी सुधारणा करण्यास वाव आहे. कोलकाता आणि हैदराबाद संघांदरम्यानची रविवारची ईडन गार्डनवरील लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाली. चेन्नईने यापूर्वीच्या लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध ९७ धावांनी दमदार विजय मिळविला होता. गृहमैदानावर चेन्नई संघ कामगिरीत सातत्य राखण्यास प्रयत्नशील आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ गेल्या लढतीत झालेले नुकसान भरून काढण्यास उत्सुक आहे. युसूफने आतापर्यंत ९१ धावा फटकावल्या आहेत; पण नाबाद ४० धावांची त्याची खेळी संस्मरणीय ठरली होती. फिरकीपटू सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या शैलीबाबत पुन्हा एकदा तक्रार करण्यात आल्यामुळे संघ अडचणीत आला आहे. सुनीलला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य आहे; पण त्याची पुन्हा तक्रार झाली, तर तो अडचणीत येण्याची शक्यता आहे. नरेन संघाचा प्रमुख गोलंदाज असला, तरी आयपीएलच्या आठव्या पर्वात त्याला अद्याप विशेष छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे नरेनचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. चेन्नईसारख्या बलाढ्य संघाच्या आव्हानाला सामोरे जाताना केकेआर संघाला प्रत्येक विभागात सरस कामगिरी करणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्नी मोर्कल व भारतीय वेगवान गोलंदाज उमेश यादव गोलंदाजीमध्ये गंभीरची चिंता बऱ्याच अंशी कमी करण्यात यशस्वी ठरले आहेत. चेन्नईसाठी आशिष नेहराने सर्वाधिक १२ बळी घेतले आहेत, तर ब्राव्होने ८ बळी घेत प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविले आहे. (वृत्तसंस्था)४चेन्नई संघाला आपल्या नेतृत्वाखाली यश मिळवून देण्यात यशस्वी ठरलेला कर्णधार धोनी संघासाठी जमेची बाजू आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळाडू कुठलेही दडपण न बाळगता नैसर्गिक खेळ करतात, असे चित्र आहे. धोनीने सर्व संघ सहकाऱ्यांवर विश्वास व्यक्त करताना आतापर्यंत अंतिम संघात कुठलाच बदल न करता खेळण्याची संधी दिली आहे.४सर्वच खेळाडू फॉर्मात असल्याचे दिसून येत आहे. फलंदाजीमध्येब्रेन्डन मॅक्युलमने सहा सामन्यांत २३२ धावा फटकावल्या आहेत. धोनी आपल्या आवडीच्या क्रिकेट प्रकारात शानदार फलंदाजी करीत आहे.धोनीने १७१ धावा फटकावल्या आहेत. ड्वेन स्मिथने २२८ धावा केलेल्या आहेत.४भारतीय संघातून अनेक दिवसांपासून बाहेर असलेला गंभीर सध्या संघाची वाट सुकर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गंभीरने गेल्या पाच सामन्यांत फलंदाजी क्रमांकामध्ये विशेष बदल केलेले नाहीत. आंद्रे रसेल, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे व स्वत: गंभीर धावा करण्यात यशस्वी ठरलेले आहेत.४कर्णधार गंभीरने संघातर्फे सर्वाधिक १९० धावा फटकावल्या आहेत, तर रसेलने पाच सामन्यांत १२६ धावा केलेल्या आहेत. युसूफ पठाणला कामगिरीत सातत्य राखता आलेले नसले, तरी मोक्याच्या क्षणी मात्र त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. कोलकाता नाईट राईडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल, पीयूष चावला, सुनील नरेन, उमेश यादव, मोर्नी मोर्केल, रेयॉन टेन डोयशे, अझहर मेहमूद, योहान बोथा, पॅट कमिन्स, ब्रॅड हॉग, केसी करियप्पा, आदित्य गढवाल, शेल्डन जॅक्सन, कुलदीप यादव, सुमित नरवाल, वीर प्रतापसिंग आणि वैभव रावल.चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), आशिष नेहरा, बाबा अपराजित, ब्रेंडन मॅक्युलम, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, फ्रांकोइस डुप्लेसिस, ईश्वर पांडे, मॅट हेन्री, मिथुन मन्हास, मोहित शर्मा, पवन नेगी, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, सॅम्युअल बद्री, सुरेश रैना, रोनित मोरे, मायकेल हसी, राहुल शर्मा, काइल एबोट, अंकुश बैस, इरफान पठाण, प्रत्युषसिंग, अ‍ॅण्ड्र्यू टाये आणि एकलव्य द्विवेदी.