शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

सुपर बुमराह

By admin | Updated: April 30, 2017 03:38 IST

गुजरात लायन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा अत्यंत चुरशीचा सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. मुंबईचा संघ सुपर ओव्हरही पूर्ण खेळू शकला नाही.

- आकाश नेवे / आॅनलाइन लोकमत

गुजरात लायन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा अत्यंत चुरशीचा सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये पोहोचला. मुंबईचा संघ सुपर ओव्हरही पूर्ण खेळू शकला नाही. पुन्हा एकदा गुजरातला विजयासाठी माफक आव्हान मिळालेले, गुजरात संघाकडून बेफाम फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले अ‍ॅरॉन फिंच आणि ब्रेंडन मॅक्क्युलम फलंदाजीसाठी आले. अशा दबावाच्या क्षणी मुंबईसाठी धावून आला तो जसप्रीत बुमराह. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने आपल्यावर सोपवलेली जबाबदारी त्याने योग्य निभावत मुंबईला विजय मिळवून दिला. सुपर ओव्हरमध्ये मुंबईने किरॉन पोलार्डच्या दहा धावांमुळे गुजरातला १२ धावांचे लक्ष्य दिले. मात्र फटकेबाजी करताना पोलार्ड बाद झाला, तर जोश बटलरही एक धाव काढून पाचव्याच चेंडूवर बाद झाला. सुपर ओव्हरही मुंबईचा संघ पूर्ण खेळू शकला नाही, मोक्याच्या क्षणी आपल्या वेगवान गोलंदाजीचे अस्त्र बाहेर काढणाऱ्या रोहितने सुपर ओव्हरची जबाबदारी बुमराहला दिली. त्यातही पहिल्याच चेंडूवर पाय क्रीजच्या बाहेर पडल्याने नो बॉल गेला. नंतर आणखी एक बॉल वाईड होता. एकूण ८ चेंडू टाकूनही बुमराहने फिंच किंवा मॅक्क्युलमला एकही चौकार किंवा षटकार मारण्याची संधीच दिली नाही. अफलातून यॉर्करचा मारा करत आपल्याला यॉर्कर मॅन हे नाव किती सार्थ आहे, हे बुमराहने दाखवून दिले. त्याआधी कृणाल पांड्याची गोलंदाजीही गुजरातला महागात पडली. पांड्याने ४ षटकांत १४ धावा देत तीन गडी बाद केले.सामन्याची सुरुवातच युवा इशान किशनच्या फटकेबाजीने झाली. एका बाजूने झारखंडचा हा युवा खेळाडू अप्रतिम फटकेबाजी करत होता. तर दुसऱ्या बाजूने फिंच, मॅक्क्युलम, रैना, कार्तिक यासारखे धुरंधर एकापाठोपाठ एक तंबूत परतत होते. किशनची ही खेळी अनुभवी हरभजनसिंह ने संपुष्टात आणली. मुंबईच्या डावाची सुरुवातही तशी दणक्यातच झाली. पार्थिव पटेलने तुफान फटकेबाजी करत ४४ चेंडूत ७० धावा केल्या, मात्र त्यालाही म्हणावी तशी साथ लाभली नाही.अखेरच्या षटकांत अवाक्यात असलेले लक्ष्य पूर्ण करताना मुंबईची दमछाक झाली. अखेरच्या चेंडूवर धाव घेताना पांड्या बाद झाला आणि सामना सुपर ओव्हरपर्यंत खेचला गेला.मुंबई संघाने या विजयासह गुण तक्त्यात दुसरे स्थान राखले आहे. मुंबई आणि अव्वल स्थानावर असलेल्या कोलकाता संघाचे गुण सारखे असले तरी कोलकाता संघ नेट रनरेटने सरस आहे.