ऑनलाइन लोकमत
हेद्राबाद, दि. २ - नाणेफेक जिंकत चेन्नई सुपरकिंग्जने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सन रायजर्सन हैद्राबादने त्यांच्या घरच्या मैदानावर १९२ धावा करत चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या गोलंदांजांना चांगलेच दमवले आहे. डेव्हिड वॉर्नरने फक्त २८ चेंडूत ६१ धावा केल्या असून शिखर धवनने ३७ धावा केल्या आहेत. त्यानंतर आलेल्या हेन्रीकची धोनीने त्रिफळा उडवल्याने १९ धावांवर त्याला तंबूत परतावे लागले. तसेच ब्राव्होच्याच गोलंदाजीवर धोनीने आशिष रेड्डीची झेल घेतल्याने तो ६ धावा करत तंबूत परतला. तर मॉर्गनने शेवटपर्यंत नाबाद राहत ३२ धावा केल्या आहेत. ब्राव्होने तीन गडी बाद केले असून नेहरा, रैना व नेगीने प्रत्येकी एक एक गडी बाद केला आहे.