शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
4
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
5
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
6
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
7
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
8
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
9
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
10
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
11
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
12
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
13
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
14
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
15
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
16
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
17
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
18
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
19
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना
20
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई

आरसीबीपुढे सनरायजर्सचे आव्हान

By admin | Updated: April 5, 2017 00:08 IST

आयपीएलच्या दहाव्या पर्वात आज, बुधवारी सलामी लढतीत विद्यमान चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

हैदराबाद : आघाडीचे काही खेळाडू दुखापतग्रस्त असल्यामुळे चिंतेत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आयपीएलच्या दहाव्या पर्वात आज, बुधवारी सलामी लढतीत विद्यमान चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. कर्णधार विराट कोहली व स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स दुखापतग्रस्त असल्यामुळे सलामी लढतीत खेळू शकणार नाहीत. कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली आहे तर डिव्हिलियर्स पाठदुखीतून सावरत आहे. आरसीबी संघाला सलामीवीर के.एल. राहुलची उणीवही भासणार आहे. दुखापतीमुळे त्याला या सत्रात सहभागी होता येणार नाही. आरसीबीचा युवा फलंदाज सरफराज खान बेंगळुरूमध्ये सरावादरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला. सरफराजही यंदाच्या मोसमाला मुकण्याची शक्यता आहे. कोहली सुरुवातीच्या काही लढतींना मुकणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आरसीबी संघाने शेन वॉटसनची प्रभारी कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आरसीबी संघाची भिस्त आता ख्रिस गेलवर आहे. गेलला सूर गवसला तर प्रतिस्पर्धी संघ अडचणीत येतो. भारताचा उदयोन्मुख फलंदाज केदार जाधवची जबाबदारी आता वाढली आहे. आॅस्ट्रेलियाचा टी-२० स्टार ट्रॅव्हिस हेड, भारतीय खेळाडू सचिन बेबी आणि मनदीप सिंग यांचे फलंदाजीतील महत्त्व वाढले आहे. आयपीएल २०१७ च्या लिलावामध्ये मोठ्या रकमेला करारबद्ध करण्यात आलेला इंग्लंडचा वेगवान गोलंदाज टाइमल मिल्सच्या समावेशामुळे आरसीबीची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. फिरकीची बाजू यजुवेंद्र चहल सांभाळणार आहे. या व्यतिरिक्त वेस्ट इंडिजचा लेग स्पिनर सॅम्युअल बद्री, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी यांच्या समावेशामुळे गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. सनरायजर्स हैदराबाद संघ गेल्या वर्षीच्या कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. हैदराबाद संघात आयपीएलच्या सर्वांत आक्रमक फलंदाजांपैकी एक कर्णधार डेव्हिड वॉर्नर आहे. गेल्या वर्षी त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. वॉर्नरला अलीकडेच संपलेल्या भारत दौऱ्यात आॅस्ट्रेलियातर्फे चांगली कामगिरी करता आली नव्हती, पण धरमशालामध्ये चौथ्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली होती. हैदराबाद संघाला त्याच्याकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. वॉर्नरच्या साथीने आघाडीच्या फळीत शिखर धवन जबाबदारी सांभाळणार आहे. धवन चमकदार कामगिरी करीत भारतीय संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. धवनने अलीकडेच देवधर ट्रॉफी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. मधल्या फळीतील युवराजच्या उपस्थितीमुळे सनरायजर्स संघाची फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. संघात मोएजेस हेन्रिक्स, केन विलियम्सन, नमन ओझा, दीपक हुड्डा व विजय शंकर हे फलंदाजही आहेत. सनरायजर्सने गोलंदाजीची बाजू मजबूत करण्यासाठी अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानचा संघात समावेश केला आहे. अष्टपैलू युवराज सिंग, हेन्रिक्स, बेन कटिंग, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन यांच्याकडून संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)>सामन्याची वेळ : रात्री ८ पासून.स्थळ : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद