मुंबई : मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने सुवर्ण जयंती सोहळ्यात प्रसिद्ध क्रिकेटर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. गावसकर यांना हा पुरस्कार ११ डिसेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान प्रदान करण्यात येणार आहे.मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेने याआधी पहिला जीवनगौरव पुरस्कार बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांना प्रदान केला होता. गावसकर यांनी भारतीय क्रिकेटसोबत आपले शानदार ५0 वर्षे पूर्ण केली. त्यांनी आपले प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण आॅक्टोबर १९६६ मध्ये मोइनू-दोल्ला गोल्डकपच्या उपांत्यपूर्व सामन्यात केले होते.
सुनील गावसकर यांना जीवनगौरव
By admin | Updated: October 22, 2016 01:03 IST