शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुमित ठरला हिंदकेसरी

By admin | Updated: May 1, 2017 01:41 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदकेसरी कुस्ती

- दिनेश गुंड -श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत किताबाच्या अंतिम लढतीत एनसीआरच्या सुमितने महाराष्ट्राच्या अभिजित कटकेला ९-२ गुणांनी पराभूत करून हिंदू केसरीची गदा आणि रोख अडीच लाख रुपये जिंकले. अभिजितला दीड लाखावर समाधान मानावे लागले. विजेतेपदाच्या लढतीत सुमितने आपल्या आंतरराष्ट्रीयस्तराचा अनुभव पणाला लावत अभिजितला सुरुवातीपासून आक्रमणाची संधी न देता एकेरी पट, लपेट दस्ती ही डाव करीत आपले गुणांचे खाते पहिल्या फेरीतच ४-२ ने आघाडी घेऊन अभिजितच्या विजयाचा मार्ग खडतर करून ठेवला. दोघेही उंचीने सारखे असल्यामुळे अभिजितच्या डावांवर प्रतिडाव करीत सुमित दुसऱ्या फेरीतही सरस ठरला. अभिजितने दिलेली चिवट झुंज तितकाच प्रतिकार करीत सुमितने मोडून काढली. ७-७ मिनिटांच्या दोन फेऱ्या अखेर सुमित ९-२ गुणांनी हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला.तत्पूर्वी, अखंड परंपरा जमलेल्या भारत देशाच्या लाल मातीचा सर्वोत्तम किताब हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेला आज अंतिम फेरीच्या लढतीसाठी पुणे जिल्ह्यातील कुस्तीशौकिनांनी ४ वाजल्यापासूनच हजेरी लावण्यास प्रारंभ केला आणि पाहता पाहता मैदान गर्दीने फुलून गेले. पहिल्या उपांत्यफेरीच्या लढतीत सुरुवातीपासूनच क्रिशन आक्रमक होता. एका पाठोपाठ एक आक्रमण करत एकेरीपट आणि दुहेरीपट डाव करत क्रिशनने पहिल्या फेरीत ५ गुण वसूल गेले. दुसऱ्या फेरीत जोगिंदरने आपले हुकमी अस्त्र टांग डावाचा केलेला प्रयत्न क्रिशनने उधळून लावत ही लढत ७-१ गुणांच्या फरकाने जिंकली.दुसऱ्या उपांत्यफेरीच्या लढतीत महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या अभिजित कटके आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रचंड अनुभव असलेल्या एनसीआरच्या सुमितकडून ६-१ गुणांवर पराभूत झाला.क्रॉस उपांत्यफेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या अभिजित कटकेने अतिशय प्रेक्षणीय लढतीत रेल्वेच्या क्रिशनला ८-३ पराभूत करून स्पर्धेत आपले पुनरागमन तर केलेच, परंतु रोमांचक लढतीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. क्रिशनच्या मार्गदर्शकाने पंचाच्या निर्णयावर  अपिल केले. परंतु ज्युरी कृपाशंकर यांनी पंचाचा निर्णय योग्य, असे निर्णय जाहीर केले. अभिजितने लावलेली ढाक त्याला विजयी करून गेली.