शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सुमेधकुमारचा डबल गोल्डन धमाका

By admin | Updated: September 29, 2015 23:21 IST

महाराष्ट्राच्या सुमेधकुमार देवळालीवाला अचूक नेम साधत दिल्ली येथे सुरू असलेल्या आठव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत डबल गोल्डन धमाका केला.

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सुमेधकुमार देवळालीवाला अचूक नेम साधत दिल्ली येथे सुरू असलेल्या आठव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेत डबल गोल्डन धमाका केला.औरंगाबादच्या या प्रतिभावान नेमबाजाने नवी दिल्ली येथील या स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल पुरुषांच्या ज्युनिअर गटात वैयक्तिक आणि सांघिक असे दुहेरी सुवर्णयश मिळवले. सुमेधकुमार देवळालीवाला याने १० मीटर एअर पिस्टलच्या क्वालिफिकेशन राऊंडमध्ये ६०० पैकी ५७६ स्कोअर करून फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. फायनल राऊंडमध्ये तर त्याने त्याची कामगिरी कमालीची उंचावताना २०० पैकी १९९.१ गुण मिळवताना भारताला वैयक्तिक तसेच सांघिक सुवर्णपदक जिंकून दिले. रौप्यपदक भारताच्याच राजस्थान येथील हेमेंद्र खुशवाह याने मिळवले. कास्यपदक बांगलादेशच्या मोहंमद अहमद याने पटकावले. सुमेधकुमार देवळालीवाला याने हेमेंद्र खुशवाह, अचलप्रतापसिंग गरेवाल यांच्या साथीने भारताला १० मीटर एअर पिस्टलमध्येही सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले.