शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

डोपिंग प्रकरणात सुब्रत पॉल निलंबित

By admin | Updated: April 26, 2017 01:12 IST

सुप्रसिद्ध भारतीय गोलरक्षक सुब्रत पॉल डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध भारतीय गोलरक्षक सुब्रत पॉल डोप चाचणीत अपयशी ठरल्यामुळे त्याच्यावर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. फुटबॉलपटू सुब्रतने निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी ‘बी’ सॅम्पलची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे सचिव कुशाल दास यांनी सांगितले, ‘‘अर्जुन पुरस्कारविजेता पॉल गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेदरम्यान डोपिंगमध्ये दोषी आढळला. यासाठी पॉलला चार वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. सुब्रतच्या ‘अ’ नमुन्यामध्ये बंदी असलेला पदार्थ आढळला आहे. हा पदार्थ टर्बुटेलाईन आहे. नाडाने एआयएफएफला पाठविलेल्या पत्रानुसार सुब्रतवर अस्थायी स्वरूपात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.’’ श्वास घेण्यास त्रास होत असेल तर टर्बुटेलाईनचा वापर होतो. अस्थमासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधामध्ये याचा वापर करण्यात येतो. त्याचप्रमाणे खोकला व सर्दीसाठी देण्यात येणाऱ्या साधारण औषधांमध्येही हा पदार्थ असतो. पण एखाद्या खेळाडूला अस्थमासंंबंधित औषध घ्यायचे असल्यास त्याला टीयूई (उपचारासाठी विशेष सूट) प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो. वाडाने टर्बुटेलाईनला ‘बीटा-२ एगोनिस्ट््स’ गटात ठेवले आहे. या गटातील औषधांचा कुठल्याही स्थितीत स्पर्धेदरम्यान किंवा अन्य वेळी उपयोग करता येत नाही. पॉल याला आता त्याचा संघ डीएसके शिवाजीयन्सतर्फे ३० एप्रिल रोजी मिनर्व्हा पंजाबविरुद्ध आयलीग सामना खेळता येईल का, असे दास यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘त्याला ‘बी’ सॅम्पलची चाचणी आाणि त्यासोबत अस्थायी निलंबन रद्द करण्याचे अपील करता येईल. अस्थायी निलंबन रद्द करण्याचे अपील केल्यानंतर त्याला खेळता येईल. पण वाडाच्या समितीने त्याच्या अपिलाविरुद्ध निर्णय दिला आणि नाडाने आम्हाला त्याचा ‘अ’ नमुना सदोष असल्याची माहिती दिल्यानंतर तो ज्या सामन्यात खेळेल त्या लढतीत त्याच्या संघाला पराभूत मानले जाईल.’’वाडाच्या नियमानुसार राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीला (नाडा) डोप चाचणीबाबत खेळाडू व महासंघाला सूचना द्यावी लागते. खेळाडूला ‘बी’ सॅम्पलची चाचणी घेण्याची विनंती करण्याचा अधिकार असतो. ‘बी’ सॅम्पलची चाचणी प्रलंबित असेपर्यंत खेळाडू अस्थायी स्वरूपात निलंबित राहील. वाडाच्या नव्या नियमानुसार प्रथमच डोपिंगमध्ये दोषी आढळलेल्या खेळाडूवर जास्तीत जास्त चार वर्षांची बंदी घालण्यात येते. ३० वर्षीय पॉलने म्हटले, ‘मी निर्दोष असून ‘बी’ सॅम्पलची चाचणी करणार आहे. डोप चाचणीत दोषी आढळल्याच्या वृत्तामुळे मला धक्का बसला. मला नाडा किंवा एआयएफएफकडून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मला प्रसारमाध्यमांकडून याबाबत कळले. मी १० वर्षांच्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे व समर्पणाच्या भावनेने खेळलो. मी निर्दोष असल्याचे सिद्ध करणार आहे. मी ‘बी’ सॅम्पलची चाचणी घेण्याची विनंती करणार आहे. डोप चाचणीत दोषी आढळेल, असे कुठलेही कृत्य मी केलेले नाही. मुंबईच्या राष्ट्रीय शिबिरात सर्वच खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. मी दोषी आढळेल, असे मला कधीच वाटले नाही.’ पॉलने भारतातर्फे २००७ मध्ये पदार्पण केले. २०१५ पर्यंत त्याने ६४ सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. (वृत्तसंस्था)