शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

फलंदाजांचे अपयश चिंतेचा विषय

By admin | Updated: November 20, 2015 03:35 IST

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघासाठी नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे.

नागपूर : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ ने पिछाडीवर असलेल्या पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघासाठी नागपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे.मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात १०८ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बंगळुरूमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवात निराशाजनक झाली. दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव पहिल्या दिवशी २१४ धावांत संपुष्टात आला; पण पावसाच्या व्यत्ययामुळे त्यानंतर सलग चार दिवस खेळ शक्य झाला नाही आणि सामना अनिर्णीत संपला. या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण झाला नसता, तर आतापर्यंत भारतीय संघाने मालिकेत २-० अशी अघाडी मिळवली असती. भारताला भारतातच टी-२० व वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभवाचा धक्का देणारा जगातील अव्वल कसोटी संघातील फलंदाज सध्या संघर्ष करीत आहे. कर्णधार व प्रमुख फलंदाज हाशिम अमलाला अद्याप लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या व्यतिरिक्त संघातील अनेक प्रमुख खेळाडू दुखापतींनी त्रस्त असल्यामुळे पाहुण्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नागपूरमध्ये २५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील आहे, पण फलंदाजांचे अपयश त्यांच्यापुढे सर्वांत मोठी समस्या आहे. दक्षिण आफ्रिका संघाने दोन कसोटी सामन्यांत तीन डावांमध्ये एकूण ५०७ धावा फटकावल्या आहे. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. बंगळुरू कसोटी सामना अनिर्णीत संपल्यानंतर अमलाने स्पष्ट केले, की चार दिवस खेळ शक्य न झाल्यामुळे आम्हाला आमच्या संघातील फलंदाजीतील उणिवा शोधण्यासाठी मदत झाली. संघाबाबत अधिक सकारात्मक नाही, पण एखादा निराशाजनक दिवसही उणीव शोधण्यासाठी महत्त्वाचा ठरतो.बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात २१४ धावांत गारद झाला, तर भारताने दिवसअखेर बिनबाद ८० धावांची मजल मारली. त्यानंतर चार दिवस खेळ शक्य झाला नाही. पाहुण्या संघातर्फे केवळ एबी डिव्हिलियर्स (८५) सन्मानजक खेळी करण्यात यशस्वी ठरला. अमला म्हणाला, ‘‘कसोटी सामने केवळ पहिल्याच दिवशी जिंंकता येत नाही. आमच्याकडे सामन्यात पुनरागमन करण्यासाठी बराच वेळ होता. कसोटी सामन्यांत काय घडू शकते, हे आपल्याला माहीत नसते. निराशाजनक सुरुवातीनंतर आम्हाला पुनरागमनचा विश्वास होता. नागपूर वेगळे स्थळ असून, तेथे आम्हाला चांगल्या सुरुवातीची आशा आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी डेल स्टेन संघात परतेल, अशी आशा आहे. स्टेनच्या दुखापतीमध्ये किती सुधारणा आहे, हे आताच सांगता येणार नाही. मी याबाबत अद्याप फिजिओसोबत चर्चा केलेली नाही, पण नागपूर कसोटीपर्यंत तो फिट होईल, असा विश्वास वाटतो.’’ (वृत्तसंस्था)बंगळुरूची खेळपट्टी चांगली होती, पण फलंदाजीदरम्यान आम्हाला भागीदारी नोंदवण्यात अपयश आले. एबीने चांगली कामगिरी केली, त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ लाभली नाही. नागपूर कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा विश्वास वाटतो.- हाशिम आमला