रिओ दि जानिरो : सुआरेझच्या चावा घेण्याच्या प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेल्या उरुग्वे संघासमोर वर्ल्डकप फुटबॉलच्या बाद फेरीच्या लढतीत शनिवारी जबरदस्त फॉर्ममध्ये असणा:या कोलंबियाचे आव्हान असेल. या सामन्यात उरुग्वे संघावर सुआरेझच्या बंदीचे सावट असल्यामुळे कोलंबियाची बाजू वरचढ मानली जात आह़े
आपल्या गटात कोलंबियाने सलग तीन विजय मिळवून थाटात स्पर्धेच्या बाद फेरीत धडक मारली होती़ या संघाने ग्रीस, आयव्हरी कोस्ट आणि जपान या संघांवर विजय मिळविला होता,तर डी गटात उरुग्वे संघ गुणतालिकेत दुस:या क्रमांकावर राहिल्यानंतर 16 संघांत पोहोचला होता़
उरुग्वे संघ अनुभवी खेळाडू सुआरेज लुईस याच्या कामगिरीवर अवलंबून होता़ साखळी लढतीत संघाने केलेल्या 4 गोलपैकी
2 गोल सुआरेजने नोंदविले होत़े
मात्र, इटलीविरुद्धच्या लढतीत जॉजिर्ओ चिलिनीला चावा
घेतल्यामुळे त्याच्यावर आता
9 सामन्यांची बंदी घालण्यात आली आह़े त्यामुळे उरुग्वेला त्याची
उणीव भासेल.
उरुग्वेने 2क्1क्च्या फुटबॉल विश्वकपमध्ये उपांत्य फेरी गाठली होती, तर कोलंबिया संघ 199क्नंतर पहिल्यांदाच बाद फेरीत पोहोचला आह़े आतार्पयत ज्या प्रकारे कोलंबियाची वर्ल्डकपमध्ये कामगिरी झाली, त्यावरून हा संघ उरुग्वेविरुद्ध सवरेत्कृष्ट कामगिरी क रू शकतो, हे स्पष्ट आह़े
सप्टेंबर 2क्13मध्ये हे दोन्ही संघ अखेरच्या वेळी आमनेसामने आले होत़े तेव्हा या लढतीत उरुग्वेने 2-क् असा विजय मिळविला होता़ कोलंबिया आणि उरुग्वे यांच्यात आतार्पयत एकूण 38 सामने झाले आहेत़ त्यांपैकी उरु ग्वेने 18 सामने आपल्या नावे केले आहेत,तर कोलंबियाने 11 सामन्यांत सरशी साधली होती़ या दोन्ही संघांतील 11 सामने बरोबरीत सुटले आहेत़ (वृत्तसंस्था)
हेड टू हेड..
कोलंबिया आणि उरुग्वे यांच्यात आतार्पयत 38 सामने खेळविण्यात आले. त्यात कोलंबियाने 11 तर उरुग्वेने 18 सामने जिंकले. उभय संघांत आातर्पयत 9 सामने अनिर्णित अवस्थेत सुटले. उभय संघांत एकूण 97 गोलची नोंद झाली. त्यात कोलंबियाने 43 तर उरुग्वेने 54 गोल नोंदवले आहेत.
आताच्या विश्वचषकात..
आतार्पयतच्या 3 सामन्यांत कोलंबियाने विजयाची हॅट्ट्रीक साधली. तर उरुग्वेला एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. कोलंबियाने आतार्पयत 9 तर उरुग्वेने 4 गोल नोंदवले आहेत. कोलंबियाचा अटेम्प्ट रेट हा 7क् टक्के तर उरुग्वेचा 7क् टक्के आहे. विशेष म्हणजे, कोलंबियाच्या एकाही खेळाडूला आतार्पयत रेड कार्ड दाखवण्यात आलेले नाही.
कोलंबिया : डेव्हिड ओस्पिना, ािस्टीयन जपाता, मारिओ येपेस, कालरेस साचेंज, जुआन जुनिगा, पाब्लो अर्मेरो, एबेल एग्विलर, जुआन कुआडराडो, व्हिक्टर इबाबरे, टिओफिलो गुटिरेज, ज्ॉक्सन मार्टिनेज़
उरुग्वे : फर्नाडो मुस्लेरा, मार्टिन काकेरस, डिएगो गुगानो, डिएगो गोडिन, मॅक्सिमिलिआनो परेरा, अल्वारो गोन्जालेज, एग्डियो अरेवालो रिओस, ािस्टीयन रॉड्रिग्ज, निकोलस लोडिरो, डिएगो फोरलान, एडिन्सन कवानी़